मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

PHOTO: इन्कम टॅक्सचा छापा पडण्यापुर्वी अनुरागनं घेतली होती ‘या’ नेत्याची भेट

PHOTO: इन्कम टॅक्सचा छापा पडण्यापुर्वी अनुरागनं घेतली होती ‘या’ नेत्याची भेट

आयकर विभागाच्या पथकानं अनुरागच्या मुंबईतील मालमत्तावर छापे टाकले. (IT raid Anurag Kashyap) मात्र या कारवाईत त्यांच्या हाती अक्षेपार्ह अशी कुठलीही गोष्ट लागली नाही. मात्र छापा पडण्यापूर्वी त्यानं एका राजकीय नेत्याची भेट घेतली होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 4 मार्च: दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) घरावर आयकर विभागानं धाड टाकली. आयकर विभागाच्या पथकानं अनुरागच्या मुंबईतील मालमत्तावर छापे टाकले. (IT raid Anurag Kashyap) मात्र या कारवाईत त्यांच्या हाती अक्षेपार्ह अशी कुठलीही गोष्ट लागली नाही. दरम्यान ही छापेमारी होण्यापूर्वी अनुरागनं भारतीय कामगार सेनेचे नेता रघुनाथ कुचिक यांची भेट घेतली होती. (BKS neta Raghunath Kuchik)

रघुनाथ कुचिक हे भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी आणि महाराष्ट्र मिनिमम वेजेस एडवाइजरी बोर्डाचे चेअरमॅन आहेत. अनुराग आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुण्यात गेल्या होता. त्यावेळी त्यानं रघुनाथ कुचिक यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. रघुनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अनुरागसोबत बॉलिवूडमधील सद्य परिस्थितीवर चर्चा केली. लॉकडाउनमुळं सिनेसृष्टीला किती फटका बसला? परिस्थिती पहिल्यासारखी व्हायला आणखी किती वेळ लागेल? याबाबत त्यांनी चर्चा केली.

या धाडीदरम्यान आयकर विभागानं अनुरागचा फोन आणि लॅपटॉप जप्त केला. त्याच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईजची फॉरंसिक चाचणी केली जाणार आहे. शिवाय त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स, वॉट्सअप चॅट, इमेल या गोष्टी देखील तपासून पाहिल्या जातील. या छापेमारीदरम्यान आयकर पथकाच्या हाती अद्याप कुठलीही आक्षेपार्ह माहिती लागलेली नाही. शिवाय मुंबईतील तब्बल 22 ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या.

अवश्य पाहा - अनुराग-तापसीच्या समस्यांमध्ये वाढ; इन्कम टॅक्सच्या छाप्यानंतर ED करणार चौकशी

'फँटम फिल्म'आणि 'क्वान' या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आले. त्यांनी कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. या कर चोरी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही आयकरनं म्हटलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी 2011 मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी 2018 मध्ये बंद करण्यात आली होती.

First published:

Tags: Anurag kashyap, Case ED raids, Crime news, Income tax, Marathi entertainment, Money, Taapsee Pannu