मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सेक्स वर्कर म्हणून अभिनेत्रीची बदनामी; Amazon Prime ला न्यायालयाकडून दणका

सेक्स वर्कर म्हणून अभिनेत्रीची बदनामी; Amazon Prime ला न्यायालयाकडून दणका

अभिनेत्री (Sakshi Malik) साक्षी मलिकनं Amazon Prime विरोधात तक्रार दाखल केली. तिला न विचारता चित्रपटामध्ये तिच्या फोटोंचा वापर सेक्स वर्कर म्हणून करण्यात आला. या प्रकरणी तिनं मानहानीचा दावा ठोकला आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 4 मार्च: Amazon Prime Video हा ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या वारंवार वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. नुकतेच ‘तांडव’ या वेब सीरिजमुळं त्यांना भारतीय प्रेक्षकांची माफी मागावी लागली होती. त्यानंतर आता एका चित्रपटामुळं त्यांना मुंबई उच्च न्यायालयाची (Bombay High Court) फटकार बसली आहे. अभिनेत्री (Sakshi Malik) साक्षी मलिकनं Amazon Prime विरोधात तक्रार दाखल केली. तिला न विचारता चित्रपटामध्ये तिच्या फोटोंचा वापर सेक्स वर्कर म्हणून करण्यात आला. या प्रकरणी तिनं मानहानीचा दावा ठोकला आहे. कोर्टानं देखील या तक्रारीची गांभीर्यानं नोंद घेत त्वरीत ती दृश्य डिलिट करण्याचे आदेश दिले आहेत.

Amazon Prime Videoवर व्ही हा तेलगू चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच या चित्रपटानं एक नवा वाद निर्माण केला आहे. या चित्रपटामध्ये साक्षी मलिकचे फोटो सेक्स वर्कर म्हणून दाखवण्यात आले होते. अर्थात या प्रकारामुळं साक्षी संतापली अन् तिनं निर्मात्यांविरोधात मानहानीचा दावा ठोकला.

अवश्य पाहा - ‘तांडव’ला सर्वोच्च न्यायालयाचा फटका; अ‍ॅमेझॉन प्राईमला मागावी लागली माफी

कोर्टानं देखील तिच्या तक्रारीची नोंद घेत निर्मात्यांना सुनावलं व ती दृश्य त्वरीत डिलिट करण्याचे आदेश दिले. जर त्यांनी कोर्टाचा आदेशाकडे दुर्लक्ष केलं तर चित्रपटावरच बंदी घातली जाईल अशी तंबी देखील दिली आहे.

एखाद्याची परवानगी नसताना त्याचा खासगी फोटो वापरणं अयोग्य आणि पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने नमूद केलं. तसंच या खटल्यात हा प्रकार बदनामीकारकही ठरू शकतो, असंही कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टात साक्षीच्या बाजूनं वकील सवीना बेदी यांनी बाजू मांडली. “साक्षी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. अशा प्रकारच्या कृत्यामुळं तिची बदनामी झाली आहे.” असं बेदी कोर्टात म्हणाल्या. ऑगस्ट 2017 मध्ये साक्षीने एक पोर्टफोलिओ शूट केलं होतं, ते फोटो तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील पोस्ट केले होते. त्यातील एक फोटो V सिनेमातील एका दृष्यात सेक्स वर्कर म्हणून दाखवण्यात आला. 5 सप्टेंबर 2020 रोजी हा चित्रपट अ‍ॅमेझॉनवर प्रदर्शित झाला होता.

First published:

Tags: Crime, Marathi entertainment, The Bombay High Court