मुंबई, 7 ऑक्टोबर : 2 ऑक्टोबरपासून सगळीकडे एकच चर्चा पहायला मिळतेय ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन चार ची. बिग बॉस सुरु झाल्यापासून सदस्यांमध्ये अनेक वाद-विवाद पहायला मिळत आहे. याशिवाय काही प्रमाणात मस्तीही सुरु आहे. अशातच बिग बॉस 4 मध्ये एका लोकप्रिय अभिनेत्याने एण्ट्री घेतली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील यश म्हणजेच अभिनेता श्रेयश तळपदे आहे. बिग बॉसच्या घरात ‘झुकेगा नही साला’, म्हणत अभिनेत्रा श्रेयस तळपदेनं एण्ट्री घेतली. मात्र एक विशेष बाब म्हणजे या मालिकेतील आणखी एक कलाकार पहिलंच या घरामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नेहाचा पहिला नवरा असलेला अभिनेता निखिल राजेशिर्केही या घरात सहभागी झालाय. त्यामुळे आता नेहाचे दोन्ही नवरे बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. त्यामुळे घरात काय होणार, दोघांमध्ये कसं इक्वेशन आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
आता या घरात माझीसुद्धा धमाकेदार एंट्री होत आहे. त्यामुळे बघत रहा बिग बॉस मराठी’, असं म्हणत श्रेयसनं बिग बॉसच्या घरात धडाकेबाज एण्ट्री घेतली. श्रेयशच्या बिग बॉसमधील उपस्थितीनं त्यानं मालिका सोडली की काय?, असा प्रश्न उपस्थित झालाय. मात्र त्याला बिग बॉसच्या घरात पाहून अनेकजण उत्साही आहेत. अनेकांना त्याच्या येण्याचा आनंद झालाय.
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चान्स पे डान्स या उपकार्यात टीम A विजयी ठरली. टीम A ने चौथ्या सिझनच्या पहिल्या साप्ताहिक कार्यात विजय मिळवला. साप्ताहिक कार्यात विजयी ठरल्याने टीम A मधील सदस्यांना पहिल्या आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्याची संधी मिळाली. आता बघूया टीम B कोणकोणत्या सदस्यांकडून उमेदवारीची संधी हिरावून घेणार आणि कोण ठरणार पहिल्या कॅप्टन्सी कार्यचे उमेदवार.