मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पुण्याच्या दीप्ती तुपेनं जिंकलं अमिताभ यांचं मन; मात्र या प्रश्नावर करावं लागलं क्वीट

पुण्याच्या दीप्ती तुपेनं जिंकलं अमिताभ यांचं मन; मात्र या प्रश्नावर करावं लागलं क्वीट

नुकताच अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर मराठमोळी दीप्ती तुपे(Deepti Tupe) विराजमान झाली होती.

नुकताच अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर मराठमोळी दीप्ती तुपे(Deepti Tupe) विराजमान झाली होती.

नुकताच अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर मराठमोळी दीप्ती तुपे(Deepti Tupe) विराजमान झाली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 14 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati 13) हा शो नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) या शोचं निवेदन करतात. सध्या या शोमध्ये गणेशोत्सव स्पेशल आठवडा साजरा केला जात आहे. नुकताच अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर मराठमोळी दीप्ती तुपे(Deepti Tupe) विराजमान झाली होती. आपल्या पुणेरी अंदाजाने दीप्तीने अमिताभ बच्चनसोबत सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र तिला १, लाख ६० हजारांवरच समाधान मानावं लागलं.

नुकताच 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये संचाली चक्रवर्ती ही हॉट सीटवर बसली होती. तिच्या ६ लाख ४० हजारांच्या यशस्वी खेळीनंतर हॉट सीटवर महाराष्ट्राची दीप्ती तुपे यांची वर्णी लागली होती. पुण्याच्या दिप्तीने आपल्या बोलक्या स्वभावाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अमिताभ यांच्यासोबत तिने अनेक किस्सेसुद्दा शेअर केले आहेत. तर अमिताभ यांनीसुद्धा तिच्यासोबत आपल्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

3 लाख 40 हजारांसाठी असा होता प्रश्न-

दिप्तीला 3 लाख 40 हजारांसाठी प्रश्न होता, 'सर्वसाधारणपणे भारतीय संसदेत प्रत्येक बैठकीची सुरुवात कशाने होते?' यासाठी पुढीलपैकी चार पर्याय देण्यात आले होते. १) शून्यकाळ २) प्रश्नकाळ ३) विधायक कार्य ४) विशेषाधिकार प्रस्ताव याचं योग्य उत्तर होत २) प्रश्नकाळ. मात्र योग्य उत्तर माहिती नसल्याने दीप्तीला या प्रश्नावर थांबावं लागलं होतं. आणि तिला १ लाख ६० हजारांसोबत हा शो सोडावा लागला होता.

(हे वाचा:जॅकलिन फर्नांडिसचं खास सेलेब्रेशन; किन्नर ट्र्स्टला भेट देत साजरा केला गणेशोत्सव)

दीप्तीने भलेही या शोमध्ये कमी रक्कम मिळवली असेल. मात्र तिला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं आहे. तिने आपल्या खास शैलीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. तसेच दीप्ती म्हणाली, 'मी नुकताच ४० ची झाली आहे. मात्र मला भीती वाटते कि कोणी येऊन मला काकू म्हणेल. तर माझी मुले म्हणतात आत्ता तू काकी झाली आहेस. आपलं वय मान्य कर. मात्र या मस्तमौला दीप्ती यांच्या स्वभावाने त्या आजही विशीत असल्याचा भास होतो.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Entertainment, KBC