जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / जॅकलिन फर्नांडिसचं खास सेलेब्रेशन; किन्नर ट्र्स्टला भेट देत साजरा केला गणेशोत्सव

जॅकलिन फर्नांडिसचं खास सेलेब्रेशन; किन्नर ट्र्स्टला भेट देत साजरा केला गणेशोत्सव

जॅकलिन फर्नांडिसचं खास सेलेब्रेशन; किन्नर ट्र्स्टला भेट देत साजरा केला गणेशोत्सव

नुकताच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने(Jacqueline Fernandez) किन्नर ट्रस्टला(Kinnar Trust) भेट दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 सप्टेंबर- गणपती बाप्पा (Ganesh Chaturthi 2021) सर्व भक्तांना आशिर्वाद देण्यासाठी विराजमान झाला आहे. काही ठिकाणी घरगुती गणपतींच विसर्जन देखील करण्यात येत आहे. तसेच काही भक्त ठिकठिकाणी जाऊन बाप्पाच दर्शन घेत आहेत. नुकताच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने**(Jacqueline Fernandez)** किन्नर ट्रस्टला**(Kinnar Trust)** भेट दिली आहे. तसेच त्यांच्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या गणेशमूर्तीचं दर्शनसुद्धा तिने घेतलं आहे.

जाहिरात

आपल्या राज्यघटनेनं प्रत्येक घटकाला स्वातंत्र्य दिलं आहे. तसेच प्रत्येकाला समाजात वावरण्याचा आणि आपलं आयुष्य जगण्याचा हक्कसुद्धा दिला आहे. त्यामुळे किन्नर समाजाला वेगळा घटक समजणाऱ्यांना चांगलीच चपराक आहे. हा समाज अत्यंत उत्साहाने आणि भक्तीभावाने सर्व उत्सव साजरे करतो. यावेळीसुद्धा किन्नर ट्रस्टच्यावतीने मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर बाप्पासोबत एक फोटो शेअर करत आपल्यालाहि बाप्पाच दर्शन घडवलं आहे. जॅकलिनने फोटो शेअर करत सांगितलं आपण किन्नर ट्रस्टला भेट देऊन त्यांच्या गणेशोत्सवात सहभाग घेतल्याचं सांगितलं आहे. या फोटोमध्ये जॅकलिन पॅरोट ग्रीन रंगाच्या सिल्क काठपदर साडीमध्ये दिसून येत आहे. (**हे वाचा-** HBD: आयुष्मान नव्हे तर हे होतं बॉलिवूड अभिनेत्याचं खरं नाव ) जॅकलिनने त्यांच्या आनंदात सहभागी होत. त्यांच्यासोबत सुंदर नृत्यही केलं आहे. यातील किन्नर ट्रस्टच्या इन्स्टाग्राम पेजवर हा सुंदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावेळी जॅकलिन खूपच आनंदी दिसून येत होती. तसेच तेथील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अतिशय उत्साह दिसून येत होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात