Home /News /entertainment /

धक्कादायक! प्रियांका चोप्राच्या काकांना भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवून लुटलं

धक्कादायक! प्रियांका चोप्राच्या काकांना भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवून लुटलं

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या काकांना दिल्लीमध्ये दोन दुचाकी स्वारांनी चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना घडली आहे.

    मुंबई, 6 मे : अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या काकांसोबत दिल्लीमध्ये लूटमारीची घटना घडली. याची माहिती प्रियांकाची चुलत बहीण मीरा चोप्रा हिनं तिच्या ट्विटरवरुन दिली. तिच्या या वडीलांसोबत ही घटना ते वॉकला गेले असताना घडली. ते वॉकला गेले असताना स्कुटरवरुन आलेल्या दोन व्यक्तींना त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचा फोन हिसकावला. याबाबत ट्वीट करत मीरा चोप्रानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुद्धा टॅग केलं आहे. मीरा चोप्रानं दिल्ली पोलिसांनाही याबाबत सवाल केले आहेत. ज्यानंतर दिल्ली पोलिसांनी तिला घटनास्थळाची माहिती देण्यास सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार नॉर्थ वेस्ट दिल्लीच्या मॉडेल टाऊनच्या पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर मीरा चोप्रा प्रचंड नाराज आहे. यानंतर तिनं ट्विटवरून दिल्ली मुख्यमंत्री अविंद केजरीवाल आणि पोलिस कमिशनर यांना हे असंच शहर सुरक्षित आहे का? असा प्रश्न केला आहे. प्रियांका चोप्राची बहीण मीरा चोप्रा ही सुद्धा एक अभिनेत्री आहे. तिनं बॉलिवूडच नाही तमिळ, तेलुगू सिनेमांमध्येही काम केलं आहे. तिनं 2005 मध्ये साउथ सिनेमांतून करिअरला सुरुवात केली होती. एस जे सूर्यासोबतच्या सिनेमानंतर तिच्या करिअरला वेग आला. त्यानंतर तिनं साउथ सिनेमा सोडून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. (संपादन- मेघा जेठे.) अक्षय कुमारला 'गे' समजायची सासू, ट्विंकलशी लग्न करण्यासाठी ठेवली होती ही अट VIDEO : इम्तियाज अलीच्या भावाच्या लग्नात ऋषी कपूर यांनी केला होता धम्माल डान्स
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Priyanka chopra

    पुढील बातम्या