मुंबई, 6 मे : दिग्गज अभिनेता ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत मात्र त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत. आपल्या फिल्मी करिअरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा देणाऱ्या ऋषी कपूर यांनी दुसऱ्या इनिंगमध्येही इतर अभिनेत्यांच्या तुलनेत अधिक सिनेमात काम केलं होतं. त्यामुळेच त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. त्यांच्यासोबत काम करणारी प्रत्येकजण सध्या त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. अशाच दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी ऋषी कपूर यांचा एक व्हिडीओे सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होताना दिसत आहे.
ळापूर्वीच त्यांच्या इन्स्टाग्रामवर ऋषी कपूर यांचा एक इम्तियाज अली यांनी काही वेथ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ इम्तियाज अली यांच्या भावाच्या लग्नातील आहे. हा व्हिडीओ इम्तियाज अली यांच्या एका फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला होता. जो इम्तियाज अली यांनी त्यांच्या स्टोरीवर रिपोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी लिहिलं, 'काश्मीरमध्ये वरातीतला आरके यांचा डान्स'
या व्हिडीओच्या अगोदर इम्तियाज अली यांनी ऋषी कपूर यांच्या निधनानंतर एक पोस्ट लिहिली होती. ज्यात त्यांनी त्यांच्या भावाच्या लग्नाचा उल्लेख केला होता. त्यांनी लिहिलं, मी ऋषी कपूर यांना माझ्या भावाच्या लग्नात काश्मीरला बोलवलं होतं. ही एक फॉर्मेलिटी असते. कोणीच आलं नाही पण ते आले होते. जेव्हा वरात आली तेव्हा मी तेव्हा मला म्हणाले तुम्ही व्हा पुढे मी मागून येतो. नंतर मला समजलं की, त्यांनी असं का केलं. त्यांनी हे यासाठी सांगितलं कारण जर ते आले असते तर इतर लोक नवरदेवाला सोडून त्यांनाच बघत राहिले असते. एका महान कलाकाराला आज गमावलं.
ऋषी कपूर यांनी इम्तियाज अली यांच्या 2007 मध्ये रिलीज झालेल्या लव्ह आज कल या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. 30 एप्रिलला ऋषी कपूर यांनी एचएन रिलायन्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
(संपादन- मेघा जेठे.)