जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bhagya Dile Tu Mala : सानिया करणार का कावेरीला रत्नमालापासून दूर? एपिसोड अपडेट आला समोर

Bhagya Dile Tu Mala : सानिया करणार का कावेरीला रत्नमालापासून दूर? एपिसोड अपडेट आला समोर

Bhagya Dile Tu Mala

Bhagya Dile Tu Mala

‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत सतत ट्विस्ट येत असतात. आता मालिकेत सानियामुळे नवीन ट्विस्ट येणार आहे. त्यामुळे मालिकेची रंजकता वाढणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 ऑगस्ट : सध्या सगळ्या मालिकांमध्ये सणांची लगबग दिसत आहे. मालिकांमध्येही मंगळागौर, रक्षाबंधन हे सण उत्साहात साजरे केले जात आहेत. सगळ्या कुटुंबांमध्ये आनंदाचं  वातावरण पाहायला मिळत आहे. मालिकेच्या कथानकांमध्ये या सणांनुसार  बदल केलेला पाहायला मिळत आहे. मराठी मालिकांमध्ये या सण समारंभाच्या काळात मालिकांमध्ये ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. कलर्स वाहिनीवरील  ‘भाग्य दिले तु मला’ या मालिकेत सुद्धा मंगळागौर  साजरी केली  जाणार आहे. रत्नमालाने कावेरीलासुद्धा सानियाच्या मंगळागौरीचे आमंत्रण दिले आहे. पण त्यासोबतच मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. कलर्स वाहिनीवर ‘भाग्य दिले तु मला’ ही मालिका चांगलीच गाजते आहे. सध्या मालिका एका रंजक वळणावर असून अनेक ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळत आहेत. मालिकेचा एक नवीन  प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये आता रत्नमाला मालिकेत सानियाची मंगळागौर साजरी करताना दिसणार आहे. रत्नमाला आणि कावेरी मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहेत.

जाहिरात

रत्नमाला आणि कावेरी यांच्यामध्ये छान  नातं तयार झालं आहे. दोघीही एकमेकींना नेहमी मदत करताना दिसून येतात. आता त्यामुळेच रत्नमाला कावेरीला मंगळागौरीचे आमंत्रण देणार आहे. पण सानियाला आधीपासूनच कावेरी आवडत नाही त्यामुळे तिला कावेरीला तिच्या मंगळागौरीला बोलावलेलं आवडत नाही. तिच्या मंगळागौरीत कावेरीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. त्यामुळे आता सानियाने कावेरी आणि रत्नमाला याना दूर करण्याचा प्रण घेतला आहे. हेही वाचा - Anil Kapoor : हातात तिरंगा घेत धावत सुटले अनिल कपूर; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क आता येणाऱ्या भागांमध्ये सानिया रत्नमाला आणि कावेरी यांना एकमेकींपासून दूर करण्यासाठी नेमकी कोणती खेळी खेळणार आणि त्याचा परिणाम या दोघींच्या नात्यावर होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.  या मंगळागौरीच्या भागाचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये रत्नमाला म्हणजेच निवेदिता सराफ या अतिशय उत्साहात मंगळागौरीच्या खेळांचा सर्व करताना दिसत आहेत. हे व्हिडीओ बघून आता प्रेक्षकांना येणारे भाग बघण्याची उत्सुकता लागली आहे. मालिकेत नुकताच रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तेव्हा कावेरीने राजला राखी बांधावी अशी मागणी सुवर्णाने केली होती. पण राजनेच त्याला साफ नकार देत सुवर्णाला चांगलाच सुनावलं होतं. त्यामुळे आता  कावेरी आणि  राजला एकमेकांवरील  प्रेमाची जाणीव कधी होणार आणि हे दोघे एकमेकांकडे प्रेमाची कबुली कधी देणार हे बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात