The Zoya Factor Movie Review: क्रिकेट, प्रेम आणि अंधश्रद्धा, 'अशी' आहे सोनम-दुलकरची केमिस्ट्री

The Zoya Factor Movie Review: क्रिकेट, प्रेम आणि अंधश्रद्धा, 'अशी' आहे सोनम-दुलकरची केमिस्ट्री

सोनम कपूरचा 'द झोया फॅक्टर' (The Zoya Factor) रिलीज झाला असून आज बॉक्स ऑफिसवर 3 सिनेमाची तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि साउथ अभिनेता दुलकर सलमान यांचा बहुचर्चित सिनेमा 'द झोया फॅक्टर' (The Zoya Factor) नुकताच रिलीज झाला असून आज बॉक्स ऑफिसवर 3 सिनेमाची तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. आजच्याच दिवशी संजय दत्तचा 'प्रस्थानम', सोनम कपूरचा 'द झोया फॅक्टर' आणि सनी देओलचा मुलगा करण देओल आणि सहर बांबा यांचा 'पल पल दिल के पास' असे तीन सिनेमे प्रदर्शित होत आहेत. मात्र सोशल मीडियावरील रिअ‍ॅक्शन पाहता द झोया फॅक्टर यामध्ये बाजी मारणार असं चित्र दिसतं.

द झोया फॅक्टरमध्ये भारतीयांचं क्रिकेट वेड खूपच इंटरेस्टिंग पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. सोनम कपूर आणि दुलकर सलमान यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा कॉमेडी, प्रेम आणि रोमान्स याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. हा संपूर्ण सिनेमा झोया नावाच्या मुलीभोवती फिरतो. ज्या मुलीचा जन्म टीम इंडियानं 1983 मध्ये ज्या दिवशी वर्ल्डकप जिंकला होता तेव्हा झाला होता. त्यामुळे तिचं संपूर्ण कुटूंब तिला क्रिकेटसाठी लकी मानत असतं. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

रानू मंडलचं 'हे' गाणं ऐकून तुम्ही लता मंगेशकर यांचं ओरिजनल गाणंही विसराल!

एका युजरनं ट्विटरवर लिहिलं, हा एक सिंपल आणि स्वीट सिनेमा आहे. जो पाहून तुम्ही जेव्हा थिएटरच्या बाहेर निघता त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर एक गोड हसू असतं. सिनेमात काही उणीवा असल्या तरी हा एक सुंदर प्रयत्न म्हणता येईल. हा सिनेमा जरी #TheZoyaFactor असला तरीही सिनेमात दुलकर सलमान अलाद्दीनचा दिवा म्हणून सिध्द होतो. त्याचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे.

मुलीला KISS केल्यानं 'या' बॉलिवूड दिग्दर्शकाला मिळाली होती जीवे मारण्याची धमकी

दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, #TheZoyaFactor हा एक गंमतीदार सिनेमा आहे. कास्ट परफॉरमन्स खूप चांगला आहे. बरेच संवाद खूप विनोदी आहे. ज्यामुळे तुम्ही पोट धरून हसता. अभिषेक वर्माचा हा सिनेमा खरंच कौतुकास पात्र आहे. तर आणखी एका युजरनं लिहिलं, स्वतःसाठी काही चांगलं करावंस वाटत असे तर या विकेंडला #TheZoyaFactor पाहा. मी ट्रेंड अ‍ॅनालिस्ट नसले तरी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल हे मी सांगू शकते. या सिनेमाचे रिव्ह्यू पाहून तरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याचं दिसत आहे.

...आणि सैफ अली खान चक्क स्वतःच्याच घरचा पत्ता विसरला!

=========================================================

VIDEO : 'सगळे सण एकत्र आले', खिचडीवाल्या 'करोडपती' बबिता ताडेंशी खास बातचीत

First published: September 20, 2019, 11:54 AM IST

ताज्या बातम्या