नटून-थटून IIFA अवॉर्डला पोहोचलेल्या स्वरा भास्करनं भर ग्रीन कार्पेटवर काढली सॅन्डल

नटून-थटून IIFA अवॉर्डला पोहोचलेल्या स्वरा भास्करनं भर ग्रीन कार्पेटवर काढली सॅन्डल

आयफाच्या ग्रीन कार्पेटवरील स्वराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : आयफा (IIFA Awards 2019) नेहमीच कलाकरांच्या स्टायलिश अंदाज आणि लुक्ससाठी चर्चेत राहिला. ग्रीन कार्पेटवर आपण इतरांपेक्षा सुंदर आणि वेगळ दिसावं असा या अवॉर्ड फंक्शनला पोहोचणाऱ्या प्रत्येकचा प्रयत्न असतो. दरवर्षी भारताबाहेर होणारा हा अवॉर्ड सोहळा यंदा मुंबईमध्येच पार पडला. आयफानं यंदा 20 वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्त भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र नटून थटून या फॅक्शनला पोहोचलेल्या अभिनेत्री स्वरा भास्करनं सर्वांसमोर असं काही केलं जे पाहून सर्वजण अवाक झाले. आयफामधील तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

स्वरा भास्करनं IIFA Awards 2019 साठी व्हाइट कलरचा गाऊन घातला होता. यावर तिनं ब्लॅक कलरच्या हिल्स घातल्या होत्या. मात्र कॅमेऱ्याला पोझ देताना या हिल्समुळे ती पडता-पडता वाचली. तिनं स्वतःला सावरलं पण तिला या हिल्सचा एवढा राग आला की, पोझ देणं सोडून ती चक्क आपल्या सॅन्डल काढू लागली. हा सर्व प्रकार तोपर्यंत कॅमेऱ्यात कैद झाला. सॅन्डल काढून झाल्यानंतर स्वरानं पुन्हा एकदा पोझ दिली. एखाद्या स्टाइल दिवा प्रमाणं तिनं वेगवेगळ्या अँगलने फोटो काढून घेतले. तेही हिल्सशिवाय.

करोडपती होण्यासाठी हॉट सीटवर बसण्याची गरज नाही, घरबसल्या 'असे' जिंका 7 कोटी

स्वराची ही कृती सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाली. सर्वांच तिचं असं वागणं पाहून अवाक झाले. एवढंच नाही तर स्वरानंही स्वताच्या इन्स्टाग्रामवर सॅन्डल काढतानाचे फोटो शेअर केले. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'हे असंच झालं होतं! हिल्स सोबत माझी खूप जुनी दुश्मनी आहे. आणि आता कार्पेटवरही... श्रीजा राजगोपाल मला प्लिज मारु नकोस. हिल्सची पर्वा कोणाला आहे.'

रानू मंडलचं 'हे' गाणं ऐकून तुम्ही लता मंगेशकर यांचं ओरिजनल गाणंही विसराल

आयफाच्या ग्रीन कार्पेटवर दीपिका पदुकोन पासून ते आलिया भट पर्यंत सर्वांच त्यांच्या युनिक लुक्स आणि ड्रेसमुळे चर्चेत राहिले. एकीकडे माधुरी दीक्षितच्या रेड गाऊननं सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या तर दुसरीकडे कतरिना कैफ सुद्धच्या मरुन गाऊननं सर्वांची मनं जिंकली. तर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या विचित्र ड्रेसनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्याच्या ड्रेसवरून सध्या सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. तर स्वरा भास्कर भर ग्रीन कार्पेटवर सर्वांसमोर सॅन्डल काढल्यानं चर्चेत राहिली.

मुलीला KISS केल्यानं 'या' बॉलिवूड दिग्दर्शकाला मिळाली होती जीवे मारण्याची धमकी

=====================================================================

VIDEO : 'सगळे सण एकत्र आले', खिचडीवाल्या 'करोडपती' बबिता ताडेंशी खास बातचीत

First published: September 20, 2019, 1:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading