मुंबई, 29 जून- ICC Cricket World Cup स्पर्धेच्या महासंग्रामाला एक महिना होत आला. महिन्याभरात स्पर्धेच्या पुढच्या फेरीत कोणते संघ पोहचतील याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. ऑस्ट्रेलियाने 12 गुण मिळवत सेमीफायनलचं तिकिट पक्कं केलं आहे. गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर भारत, तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड तर चौथ्या स्थानी इंग्लंड आहे. भारताने सहापैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसाने रद्द झाला. यामुळे भारतीय संघ 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. उर्वरित तीन सामने इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध आहेत. या तीनपैकी एका सामन्यात जरी भारताने विजय मिळवला तरी सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित होईल.
कॅनडात अक्षय कुमारची आहे चक्क पूर्ण टेकडी, त्याची मालमत्ता वाचून बसेल धक्का
भारताची विजयी घोडदौड सुरू असली तरी संघासमोर सध्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या फॉर्मची चिंता सतावत आहे. दरम्यान, मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने विराटची थोडी मदतच केली आहे. स्पृहाने ट्विटवर फलंदाजी करतानाचा स्वतःचा फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणाली की, चौथ्या क्रमांकाची समस्या कशी सोडवायची हा प्रश्न पडलाय तर माझा विचार करायला हरकत नाही. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनीही धम्माल प्रतिक्रिया दिल्या आहेत.
How to solve No. 4 problem...माझाही विचार करायला हरकत नाही #ICCCricketWorldCup #INDvsWI pic.twitter.com/1ABQKLHHJX
— Spruha Joshi (@spruhavarad) June 27, 2019
विराटच्या फेवरेट स्टार क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची मुलगी
दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये 5 सामन्यात भारताने चार नंबरवर तीन फलंदाज खेळवले. यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. पांड्या नेहमी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो पण सामन्यातील परिस्थिती पाहून त्याला बढती दिली गेली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलला संधी देण्यात आली होती. चौथ्या क्रमांकासाठी तोच योग्य पर्याय होता. मात्र, शिखर धवन स्पर्धेला मुकल्यानं त्याला सलामीला उतरावं लागत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्ध विजय शंकर चौथ्या क्रमांकावर उतरला. त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. तसेच रोहित आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर धावगतीचा वेगही मंदावतो. भारतासमोर सध्यातरी मधल्या फळीतील फलंदाजी डोकेदुखी ठरत आहे.
लग्नाच्या दोन वर्षांनंतरही विराटला इम्प्रेस करण्यासाठी अनुष्काची लंडनमध्ये धडपड
ऋषभ पंतला संघात स्थान हवे
वर्ल्ड कपमध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विजय शंकरनं चांगली फलंदाजी केली नाही आहे. त्यामुळं शंकरच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यास हरकत नाही. तसेच, विजय शंकरनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 सामन्यात 223 धावा केल्या आहेत. त्यामुळं चाहत्यांनी ऋषभ पंतला संघात स्थान द्यावे अशी मागणी केली आहे.
करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा