
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विराट कोहलीला पाठिंबा देण्यासाठी लंडनला गेली आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर विराट- अनुष्काचे लंडनच्या रस्त्यांवर मनमुराद फिरतानाचे फोटो व्हायरल झाले होते.

वर्ल्ड कप 2019 मध्ये भारताचा आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला आहे. आतापर्यंत भारताने 6 सामने खेळले असून त्यातील 5 सामन्यात भारताला विजय मिळाला तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार वर्ल्डकप दरम्यान क्रिकेटर्सच्या पत्नींना त्यांच्यासोबत केवळ 15 दिवस थांबता येणार आहे. त्यामुळे अनुष्का आता विराटला या महिन्याच्या शेवटला भेटणार आहे.

अनुष्कानं लंडनमध्ये पॉटरी क्लास लावला असून ती नियमित या क्लासला जाते. या क्लासमध्ये ती मातीची भांडी बनवायला शिकत आहे.

अनुष्काच्या या क्लासमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमुळे विराटला इम्प्रेस करण्यासाठी अनुष्काची ही धडपड चालू असल्याचं बोललं जात आहे.

या आधी अनुष्कानं सुई-धागा सिनेमासाठी भरतकाम शिकली होती. पण यावेळी अनुष्का पॉटरी वर्क कोणत्याही सिनेमासाठी नाही तर स्वतःची आवड म्हणून शिकत आहे.




