Home /News /entertainment /

VIDEO: Palak तिवारीच्या 'त्या' कृत्याने नाराज Ibrahim Ali Khan, आता वाटतीये लाज

VIDEO: Palak तिवारीच्या 'त्या' कृत्याने नाराज Ibrahim Ali Khan, आता वाटतीये लाज

पलक तिवारीच्या एका कृत्याने इब्राहिम नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.

  मुंबई, 29 जानेवारी-  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari Daughter)  मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari)  आणि सैफ अली खानचा मोठा मुलगा   (Saif Ali Khan Son)  इब्राहिम अली खान   (Ibrahim Ali Khan)  गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पलक आणि इब्राहिम मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर एका कारमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. हे दोन्ही स्टारकिड्स एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न नेटिझन्सना पडला आहे.परंतु एका व्हायरल व्हिडीओमुळे  (Viral Video)  या दोघांमध्ये बिनसल्याचं म्हटलं जात आहे. पलक तिवारीच्या एका कृत्याने इब्राहिम नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. नेमकं काय घडलं?- (What exactly happened) सोशल मीडियावर इब्राहिम आणि पलकचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान कारमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. या व्हिडीओमध्ये पलक पापाराझींसमोर चेहरा लपवताना दिसली होती. तर इब्राहिम कॅमेऱ्याकडे बघून स्माईल देत होता. बॉलीवूड लाईफमधील एका रिपोर्टनुसार, पलकच्या या कृत्याने इब्राहिम खूप संतापला आहे. त्याला पलकचं हे कृत्य बालिश वाटलं आहे. या प्रसंगाची त्याला लाज वाटत असल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इब्राहिम आणि पलक या दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही बोलले जात आहे. सूत्राने अहवालात दावा केला आहे की, ते फक्त मित्र आहेत परंतु खात्रीने असे म्हणणे खूप घाईचे आहे की, या दोघांमधील सर्वकाही संपलं आहे. फक्त सध्या ते एकमेकांपासून दूर आहेत.
  इब्राहिम सध्या करण जोहरला त्याच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये असिस्ट करत आहे. इब्राहिम हा सैफची पहिली पत्नी अमृता सिंहचा मुलगा आहे. तसेच तो अभिनेत्री सारा अली खानचा भाऊ आहे. त्याला अभिनयापेक्षा दिग्दर्शनात अधिक रुची आहे. त्याने त्याचं रीतसर शिक्षणसुद्धा घेतलं आहे. (हे वाचा:Taarak Mehta...' फेम बबितावर अटकेची टांगती तलवार, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला) तर दुसरीकडे हार्डी संधूच्या म्युझिक व्हिडिओ 'बिजली बिजली'मध्ये दिसल्यानंतर पलक तिवारी एका रात्रीत स्टार बनली होती. पलक तिचा डेब्यू चित्रपट 'रोझी'च्या रिलीजची वाट पाहत आहे. हा एक हॉरर-थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट गुरुग्राममधील बीपीओ कंपनीत कर्मचारी असलेल्या रोझी नावाच्या महिलेच्या अचानक बेपत्ता होण्याच्या वास्तविक जीवनाच्या कथेवर आधारित आहे.प्रेक्षकांना या चित्रपटाच्या ट्रेलरपासून त्याच्या रिलीजची उत्सुकता लागून आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Saif Ali Khan, Shweta tiwari, Video viral

  पुढील बातम्या