मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'मी प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदरच दिसते', जाळीदार बोल्ड ड्रेस घालून ट्रोल झाल्यानंतर उर्फीचं ठाम मत

'मी प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदरच दिसते', जाळीदार बोल्ड ड्रेस घालून ट्रोल झाल्यानंतर उर्फीचं ठाम मत

ट्रोल झालेल्या ड्रेसमध्ये तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास दिसत असून आपण घातलेला ड्रेस आणि त्या ड्रेसमध्ये आपण अतिशय सुंदर दिसत असल्याचं तिचं ठाम मत तिने व्यक्तही केलं आहे.

ट्रोल झालेल्या ड्रेसमध्ये तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास दिसत असून आपण घातलेला ड्रेस आणि त्या ड्रेसमध्ये आपण अतिशय सुंदर दिसत असल्याचं तिचं ठाम मत तिने व्यक्तही केलं आहे.

ट्रोल झालेल्या ड्रेसमध्ये तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास दिसत असून आपण घातलेला ड्रेस आणि त्या ड्रेसमध्ये आपण अतिशय सुंदर दिसत असल्याचं तिचं ठाम मत तिने व्यक्तही केलं आहे.

    नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच काहीनाकाही कारणांमुळे चर्चेत असते. तिचा ड्रेसिंग सेन्स (Dressing sense) हाच बऱ्याचदा चर्चेचा विषय असतो. इतरांसाठी ज्या ठिकाणी फॅशन (Fashion) संपते तिथून उर्फीच्या फॅशनला सुरुवात होते. काही वेळा, तिचे फॅशनचे प्रयोग पूर्णपणे फसतात, तर काहीवेळा ती लोकांना आपली स्तुती करण्यास भाग पाडते. कायम अतिशय बोल्ड कपड्यांमुळे (Bold Clothes) उर्फी सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते.

    आपली कपड्यांची निवड, तिची फॅशन अतिशय आत्मविश्वासाने ती कॅरीही करताना दिसते. विशेष म्हणजे ती फक्त शूटसाठीच बोल्ड कपडे घालते असं नाही तर अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवरही त्याच अंदाजात फिरताना दिसते. आता पुन्हा एकदा उर्फी आपल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये ती स्वत:ची स्तुती करताना दिसते आहे. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम हँडलवर उर्फीचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

    हे वाचा - 'कच्चा बदाम', 'बचपन का प्यार' ते 'पावरी गर्ल'पर्यंत एका झटक्यात बदललं यांचं नशीब

    अलीकडेच उर्फीने पुन्हा एकदा तिच्या ड्रेससोबत एक एक्सपिरिमेंट केलं होतं. यावेळी ती कॉम्प्लिकेटेड डिझाईन असलेल्या एका ट्रान्सपरन्ट ड्रेसमध्ये (Urfi Transparent Dress) दिसली. या ड्रेसचं फॅब्रिक (Fabric) पातळ आणि पारदर्शक असल्यामुळे लोकांनी त्याची तुलना मच्छरदाणीशी केली. या ड्रेसमुळे उर्फी ट्रोलदेखील (Troll) झाली आहे. मात्र, उर्फीनं ट्रोलर्सला (Trollers) प्रत्त्युत्तर दिलं आहे. 'हा कॉम्प्लिकेटेड ड्रेस आणि लुक तयार करण्यासाठी खूप वेळ आणि कष्ट लागले आहेत. मी कितीही चांगले कपडे घातले तरी काही लोकांना ते वाईटच दिसतात. पण, मी प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदरच दिसते, याची मला खात्री आहे. त्यामुळे लोकांच्या टीकेनी मला फरक पडत नाही,' असं उर्फी म्हणाली आहे.

    हे वाचा - उर्फीने कहर केला..शेअर केला भलताचं video ; फॅन्स म्हणाले, 'ही फसवण

    उर्फी जेव्हा-जेव्हा नवीन अवतारात आपले फोटो पोस्ट करते तेव्हा इंटरनेटवर वेगवेगळ्या कमेंट्सचा पूर येतो. काहींना तिचा आत्मविश्वास आणि फॅशन सेन्सचं कौतुक वाटत तर, काहीजण तिच्यावर टीका करतात. यावेळी देखील उर्फीनं घातलेल्या या बोल्ड ट्रान्सपरन्ट ड्रेसवर अनेकांनी मिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, या ड्रेसमध्ये तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास (Confidence) दिसत असून आपण घातलेला ड्रेस आणि त्या ड्रेसमध्ये आपण अतिशय सुंदर दिसत असल्याचं तिचं ठाम मत तिने व्यक्तही केलं आहे.

    First published:

    Tags: Bollywood, Social media troll, Troll