जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Hum Sath Sath Hai चित्रपटातील पात्रांसाठी पहिल्यांदा 'या' प्रसिद्ध कलाकारांना दिली होती ऑफर

Hum Sath Sath Hai चित्रपटातील पात्रांसाठी पहिल्यांदा 'या' प्रसिद्ध कलाकारांना दिली होती ऑफर

Hum Sath Sath Hai चित्रपटातील पात्रांसाठी पहिल्यांदा 'या' प्रसिद्ध कलाकारांना दिली होती ऑफर

1999मध्ये आलेला हम साथ साथ है (Hun sath sath hai movie) या चित्रटाच्या पात्रासाठी पहिल्यांदा अन्य कलाकारांची विचारणा करण्यात आली होती हे तुम्हाला माहित आहे का?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जुलै : अनेक बाॅलिवूड चित्रपटांनी आपली एक वेगळी अशी छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. यातील एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘हम साथ साथ है’(Hum sath sath hai movie). हम साथ साथ है (hum sath sath hai movie cast) चित्रपटातील दमदार कास्ट, उत्कृष्ठ अभिनय यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर उचलून घेतलेलं पहायला मिळालं. चित्रपटातील प्रत्येक पात्रानं चाहत्यांच्या मनात घर केलेलं पहायला मिळालं. त्यामुळे अजूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. सूरज बर्जात्या यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मोहनीश बहल(Mohnish bahal), तब्बू (Tabbu), सलमान खान(Salman khan), सोनाली बेंद्रे(Sonali bendre), सैफ अली खान(Saif ali khan), करिश्मा कपूर(Karishma kapoor), आलोक नाथ (alok nath)आणि रीमा लागू (Reema lagoo)या कलाकारांचा समावेश आहे. मात्र 1999मध्ये आलेला हम साथ साथ है या चित्रपटाच्या पात्रासाठी पहिल्यांदा अन्य कलाकारांची विचारणा करण्यात आली होती हे तुम्हाला माहित आहे का?, चला तर मग जाणून घेऊया. हम साथ साथ है मधील अभिनेता मोहनीश बहल यांनी साकारलेल्या विवेक या पात्रासाठी पहिल्यांदा अनिल कपूर (Anil kapoor)आणि ऋषी कपूर (Rushi kapoor)यांना विचारणा करण्यात आली होती. मात्र त्या दोघांनीही विवेक या पात्रासाठी नकार दिला. त्यानंतर अभिनेता मोहनीश बहल यांची या पात्रासाठी निवड करण्यात आली. मोहनीश बदल यांनी साकारलेल्या या भूमिकेसाठी त्यांचं खूप कौतुक करण्यात आलं. अतिशय अप्रतिम भूमिका साकारत आणि उत्तम अभिनय करत त्यांनी चाहत्यांचं मन जिंकलेलं पहायला मिळालं. हेही वाचा - Koffee with Karan season 7 : आलियाची एंगेजमेंट रिंग आहे खूपच स्पेशल, मोठ्या डायमंडवर रणबीरचं नाव नाही तर कोरलाय ‘हा’ शब्द दिग्दर्शक सूरज बर्जात्या यांनी तब्बूनं साकारलेल्या साधनाच्या भूमिकसेसाठी पहिल्यांदा माधुरी दिक्षितला(madhuri dikshit) विचारलं होतं. मात्र हम आपके है कौन चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे माधुरीनं या भूमिकेसाठी नकार दर्शवला. माधुरीनंतर बर्जात्या यांनी मनीषा कोईरालाला(Manisha koirala) या भूमिकेसाठी ऑफर दिली. मात्र मनीषाचे मन चित्रपटाचे शुटिंग सुरु असल्यानं तिनंही या भूमिकेसाठी नकार दर्शवला. मग अखेर तब्बूनं साधनाची भूमिका साकारली.

जाहिरात

ऋषी कपूर यांना सूरज बर्जात्या यांनी पुन्हा या चित्रपटातील आनंद या भूमिकेसाठी ऑफर दिली होती. मात्र ऋषी कपूर यांनी पुन्हा ही ऑफर स्वीकारली नाही. त्यानंतर या भूमिकेसाठी नितीश भारद्वाज यांना ही ऑफर देण्यात आली. त्यांचाही नकार आल्यानंतर ही भूमिका महेश ठाकूर यांनी साकारली. दरम्यान, हम साथ साथ है या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. आजही हा चित्रपट आवडीनं पाहिला जातो. चित्रपटातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात