मुंबई, 19 मे- ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zal) आणि ‘फुलपाखरू’ (Phulpakhru) या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) घराघरात पोहोचली आहे.हृताचा फार मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्रीला अनेक लोक महाराष्ट्राची क्रशदेखील म्हणतात. उत्कृष्ट अभिनय आणि आपल्या अप्रतिम सौंदर्याच्या जोरावर ही अभिनेत्री तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. चाहते अभिनेत्रीबाबत जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ (Hruta-Parteeks Secret Wedding) बांधत सर्वानांच सुखद धक्का दिला आहे.सध्या सोशल मीडियावर हृताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री भावुक झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना हृता दुर्गुळेच्या लग्नाची उत्सुकता लागून होती.अभिनेत्री लग्न कधी करतेय? तिचा वेडिंग लुक कसा असणार? हे सर्व जाणून घेण्यासाठी चाहते आतुर होते. आता ही प्रतीक्षा संपली आहे. हृताने काल म्हणजेच 18 मे रोजी बॉयफ्रेंड आणि दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत मुंबईमध्ये लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने गुपचूप लग्न करत सर्वानांच चकित केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हृता आणि प्रतीकच्या लग्नाचे अनेक फोटो आणि काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडीओ मात्र फारच खास आहे. सध्या हृताचा एक व्हिडीओ फारच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री वेडिंग हॉलमध्ये एन्ट्री करतांना दिसून येत आहे. मात्र लग्नाच्या मंडपात पोहोचताच हृता अत्यंत भावुक होते. त्यांनतर तिला अश्रू आवरणं कठीण होतं. आणि ती रडू लागते.अभिनेत्रीला पाहून आईच्या डोळ्यातसुद्धा अश्रू तरळतात. सर्वसामान्य मुलगी असो किंवा अभिनेत्री लग्न हा त्यांच्या आयुष्यातील फार भावुक क्षण असतो. आणि या खास क्षणाला असे आनंदाश्रू येणं फारच साहजिक आहे. सध्या हृताचा हा व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा भावुक होत आहेत. तसेच अभिनेत्रीला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.राजश्री मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
हृताने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर आपला आणि प्रतीकचा फोटो शेअर करत, आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनतर लगेचच म्हणजे 24 डिसेंबर 2021 रोजी या दोघांनी साखरपुडा केला होता. हे दोघे लग्न कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र या कलाकारांनी गुपचूप लग्न करत सर्वानांच चकित केलं आहे.