मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Hruta Durgule: हृताचं मोठ्या पडद्यावर दणक्यात पदार्पण! एकाच दिवशी 2 सिनेमांचे टिझर प्रदर्शित

Hruta Durgule: हृताचं मोठ्या पडद्यावर दणक्यात पदार्पण! एकाच दिवशी 2 सिनेमांचे टिझर प्रदर्शित

Hruta Durgule: हृताचं मोठ्या पडद्यावर दणक्यात पदार्पण! एकाच दिवशी 2 सिनेमांचे टिझर प्रदर्शित

Hruta Durgule: हृताचं मोठ्या पडद्यावर दणक्यात पदार्पण! एकाच दिवशी 2 सिनेमांचे टिझर प्रदर्शित

नुकतंच लग्नबंधनात अडकलेली अभिनेत्री हृता दुर्गुळेची (Hruta Durgule) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. आता रंगलेली चर्चा तिच्या लग्नाची नाही तर तिच्या येऊ घातलेल्या बॅक टू बॅक दोन सिनेमांची आहे. 'अनन्या' (Ananya) आणि 'टाइमपास 3' (Timepass3) या दोन्ही सिनेमांचे टिझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 30 मे:  छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आता सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. दुर्वा (Durva) फुलपाखरु (Phulpakharu) मन मन उडू उडू झालं (Man Udu Udu Jhala) या सुपरहिट मालिकांनंतर हृता आता सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'अनन्या' (Ananya) आणि 'टाइमपास 3' ( Timepass3) या दोन सिनेमांतून हृता मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवत आहे.  दोन वेगळ्या भूमिका हृता साकारताना दिसणार आहे. या दोन्ही सिनेमांचे टिझर आज एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. अनन्या आणि टाइमपास 3 सिनेमाचे धमाकेदार टिझर प्रदर्शित झाले असून मराठी सिनेसृष्टीत सध्या हृता दुर्गुळे हे नाव चांगलचं चर्चेत आलं आहे.

हृता ही मराठी टेलिव्हजनवरील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. संपूर्ण महाराष्ट्राची क्रश म्हणून हृताची ओळख आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या मोठ्या पडद्यावरील पदार्पणासाठी तिच्या इतकेच तिचे चाहते देखील उत्साही होते आणि तिच्या चाहत्यांना एकाच दिवशी डबल सप्राइज मिळालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

हृताचे येऊ घातलेले दोन्ही सिनेमे वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. आपलं अस्तित्व आणि आत्मविश्वास आणि नवी प्रेरणा देणारा, जिद्द आणि जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता दाखवणारा अनन्या हा सिनेमा  22 जुलैला सिनेमागृहात दाखल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

तर टाइमपासमध्ये अधुऱ्या राहिलेल्या प्रेमाची गोष्ट टाइमपास २ मध्ये पूर्ण झाली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि ही हलकी फुलकी कॉमेडी असलेला बहुप्रतिक्षीत टाइमपास 3 या सिनेमातही हृता मुख्य भूमिकेत आहे. दोन्ही सिनेमात दिसणारी हृता ही फार वेगळी असणार आहे. त्यामुळे एकाच अभिनेत्रीच्या अभिनयातून दोन वेगळ्या भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा - लग्नानंतर कामावर रूजू होताच हृताने शेअर केले 'ते' दोन फोटो, काय आहे यात खास?

हृताचा 'अनन्या' हा सिनेमा 22 जुलैला प्रदर्शित होतोय तर 'टाइमपास 3' हा सिनेमा 29 जुलै रोजी प्रदर्शित होतोय. दोन्ही सिनेमासाठी प्रेक्षक उत्साही असून सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. अनन्यामध्ये हृताने एक अपंग मुलीची भूमिका साकारत आहे. अपघातात दोन्ही हात गमावलेली मुलगी तिच्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने पुन्हा आयुष्याला सुरुवात करते. तर टाइमपासमधील हृता ही डॅशिंग, धमाकेदार आणि थोडी बबली असणार आहे. दोन्ही भूमिकेसाठी हृताने घेतलेली मेहनत आज प्रदर्शित झालेल्या टिझरमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. हृताच्या मोठ्या पडद्यावरील पदार्पणाची सुरुवात तर हीट झाली आहे. आता सिनेमा काय रंगत आणणार यासाठी जुलै महिन्याची वाट पहावी लागणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Prateek Shah (@prateekshah1)

हृताचा नवरा प्रतीक शाह (Prateek Shah) देखील तिच्या सिनेमांमुळे खुश आहे. सोशल मीडियावर दोन्ही सिनेमांचे पोस्टर शेअर करत त्याने बायकोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  '2 वेगळे सिनेमे, 2 वेगळ्या भूमिका आणि एक सुपरस्टार. हृता तुझा मला फार अभिमान वाटतो. अखेर तुझे दोन्ही सिनेमे बॅक टू बॅक प्रदर्शित होणार आहे', असं म्हणत प्रतीकने सिनेमा पाहण्यासाठी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाण्याचं आवाहन देखील केलं आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Time pass marathi movie, Zee Marathi, Zee marathi serial