सोनालीचा भाऊ तिच्या लग्नाला उपस्थित राहू शकला नव्हता. पण सोनालीचं ठरलं होतं की लग्नाच्या मंडपात तोच तिला घेऊन जाणार.
देशात कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे लग्नाच्या आधी तिच्या भावाचा विझा रद्द करण्यात आला. हा सोनालीसाठी मोठा धक्का होता असं ती म्हणाली
कोरोना आणि युक्रेन हल्ल्यामुळे गडबडीत सोनालीच्या भावाच्या विझावर 2022 लिहिण्याऐवजी 2021 असं लिहिलं गेलं आणि त्यामुळे त्याचा विझा रद्द झाला आणि तिच्या आई वडिलांची फ्लाइट ही रद्द झाली.
पण सोनालीच्या लग्नात तिचा भाऊ कसा काय हजर झाला हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना प्लानेट मराठीवर प्रदर्शित झालेली तिची वेडिंग स्टोरी पहावी लागणार आहे.
सोनालीनं एकूण चार पद्धतीनं लग्न केलं आहे. तिच्या चारही पद्धतील लग्नाची संपूर्ण मालिका प्रेक्षकांसाठी तिनं प्रदर्शित केली आहे.
सेलिब्रेटीचं लग्न अशाप्रकारे ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित करणारी सोनाली कुलकर्णी ही मराठीतील पहिलीच अभिनेत्री ठरली आहे.