मुंबई, 17 सप्टेंबर : बॉलिवूडचा हॅंडसम हंक हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या चित्रपटाविषयी विविध बातम्या समोर येत असतानाच चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘विक्रम वेधा’ मधील ‘अल्कोहोलिया’ हे पहिलं गाणं रिलीज झालं असून या गाण्याने काही क्षणातच सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. गाण्यात हृतिक नशा करताना दिसत आहे. गाण्यासोबतच हृतिकचा धमाकेदार डान्स हे या गाण्याचे प्रमुख आकर्षण आहे. या गाण्यात पहिल्यांदाच प्रेक्षकांना आयटम बॉय पाहायला मिळत आहे. त्याच्या डान्सने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. अल्कोहोलिया ‘गाणं मनोज मुनताशीर यांनी लिहिले आहे. विशाल आणि शेखर यांनी संगीतबद्ध केले. सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच धूम पहायला मिळत आहे. हेही वाचा - ‘इंदिरा गांधी’ साकारल्यानंतर कंगना राणौतला वाटतेय या गोष्टीची भीती; म्हणाली… ‘विक्रम वेधा’ चित्रपट साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, ज्यामध्ये विजय सेतुपती आणि आर माधवन यांनी काम केलंय. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जागतिक स्तरावर हा चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘विक्रम वेध’ची कथा खूपच रंजक असल्याचं म्हटलं जात आहे. साहजिकच हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘विक्रम वेधा’ व्यतिरिक्त, हृतिक रोशन सिद्धार्थ आनंदच्या पुढील अॅक्शन थ्रिलर ‘फाइटर’मध्ये दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे.