मुंबई, 03 डिसेंबर : बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन त्याच्या किलर लूक आणि दमदार अभिनयामुळे करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. अभिनेता हृतिक रोशन त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सध्या तो अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. दोघेही एकमेकांबद्दल खुलेपणाने प्रेम व्यक्त करतात तर कधी ते हातात हात घालून फिरायला जातात. या दोघांची नेहमीच चर्चा होते. पण सध्या ह्रितिकला त्याच्या एका कृतीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्याची एक कृती कॅमेरात कैद झाली आणि तो व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. असं काय आहे या व्हिडिओमध्ये चला पाहूया.
हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हे दोघे नुकतेच एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाले होते. तिथे हृतिकने सेल्फी काढायला आलेल्या त्याच्या चाहत्याला चक्क धक्का दिला. लोकांना त्याची ही कृती अजिबात आवडली नाही आणि याच कारणावरून तो सध्या ट्रोल होत आहे. हृतिक सबा नुकतेच डिनर डेटला गेले होते. हॉटेलातून बाहेर पडताना दोघे एकत्र बाहेर पडले. हॉटेलातून बाहेर पडताना साहजिकच पापाराझी आणि चाहत्यांनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली. यातील काही चाहत्यांनी हे दोघे गाडी कडे जात असताना सबाकडे सेल्फी घेण्यासाठी तेव्हा हृतिकने त्याला ढकलून दिले आणि दोघे गाडीत बसून निघून गेले.
हेही वाचा - हँडसम दिसण्याचा प्रयत्न फसला; CID फेम दया आता सहन करतोय भयंकर त्रास आणि वेदना
हृतिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी त्याला सुनावले आहे. एकाने लिहले आहे “हृतिक तुला लाज वाटायला हवी, तू नाही म्हणू शकत होतास,” तर दुसऱ्याने लिहले आहे “बॉलिवूडच्या फालतू लोकांची फालतू वृत्ती आहे ही,” तिसऱ्याने तर लिहले आहे “जर दाक्षिणात्य स्टार्स कडून शिका तुमच्यापेक्षा त्यांची क्रेझ जास्त आहे.” अशा शब्दात नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
हृतिकच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं तर 20 डिसेंबर 2000 रोजी त्याने सुझान खानशी लग्न केले होते. दोघांना रिदान आणि रेहान ही दोन मुले आहेत. 2013 मध्ये हृतिक आणि सुझैन वेगळे झाले आणि 2014 मध्ये घटस्फोट घेतला. मात्र, दोघेही नेहमीच मित्र म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आणि मुलांचे संगोपन करत आहेत. सुझैन सध्या अर्सलान गोनीला डेट करत आहे तर, हृतिक सबा आझादला डेट करत आहे.
हृतिक रोशनच्या वर्क फ्रंट विषयी सांगायचं तर हृतिक रोशन पुढे अनिल कपूर आणि दीपिका पदुकोण सोबत 'फाइटर' मध्ये दिसणार आहे. दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हे दोन्ही स्टार्स बॉलीवूडमधील नंबर वन कलाकारांपैकी एक आहेत. त्यामुळेच या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.