Home /News /entertainment /

हर्ष लिंबाचियाला होतोय भारती सिंहसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, स्वतः VIDEO तुन केला खुलासा

हर्ष लिंबाचियाला होतोय भारती सिंहसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, स्वतः VIDEO तुन केला खुलासा

हर्ष आणि भारतीने नुकताच एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही त्यांच्या पहिल्या मुलाबद्दल चर्चा करताना दिसत आहेत.

    मुंबई, 22 फेब्रुवारी-   कॉमेडियन   (Comedian)  भारती सिंह   (Bharati Singh)  आपल्या मजेशीर बोलण्याने लोकांना खळखळून हसायला भाग पाडते. कॉमेडी क्वीन भारती सिंह लवकरच आई बनणार आहे. भारती सध्या तिच्या प्रेग्नेन्सीचा आनंद घेत आहे. मात्र, यासोबतच तिने आपले कामही सुरू ठेवले आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia)  एप्रिलमध्ये आईबाबा होणार आहेत. दरम्यानच्या काळात दोघेही 'हुनरबाज: देश की शान' या टॅलेंट हंट  रिएलिटी शोमध्ये होस्ट म्हणून दिसत आहेत. याशिवाय दोघांचे 'LOL-Life Of Limbachiaas' नावाचे एक YouTube चॅनल देखील आहे. जिथे हे दोघेही एकमेकांची चेष्टा मस्करी करताना दिसून येतात. हर्ष आणि भारतीने नुकताच एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही त्यांच्या पहिल्या मुलाबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. यामध्ये त्यांना पहिला प्रश्न असा पडला आहे की, मुलगा असो किंवा मुलगी परंतु त्यांचं पहिलं आपत्य भारती सिंहसारखं कॉमेडियन बनणार की वडील हर्षसारखं लेखक? य प्रश्नावर स्वतः च उत्तर देत भारती म्हणते 'आपलं मुल कॉमेडियन होईल, कारण लेखकांना पैसे मिळत नाहीत. आणि विनोदी कलाकारांसाठी…. उफफ्फ असं म्हणत ती स्वतःच कौतुक करते. त्यानंतर हर्ष भारतीला उत्तर देत म्हणतो- 'इतके पैसे उपलब्ध आहेत की त्यात 5-6 भारती सिंह येतील.' यावर भारती पुन्हा हर्षची खिल्ली उडवते आणि म्हणते की हर्षला कॉमेडियनशी इतकी अडचण आहे तर त्याने अभिनय करणं सोडून द्यावं. आपल्या कॉमेडी अंदाजात भारती पुन्हा पुढे म्हणते, 'तुम्ही जाऊन भिंतींवर लिहा. येथे कचरा टाकू नका, इथे पार्किंग करा. त्यानंतर तुम्हीही आम्हाला एखाद्या लंगरमध्ये दिसू शकता. भारतीने असेही सांगितले की, हर्षला आणखी मुलांची इच्छा आहे. उदाहरण देत भारती पुढे म्हणते- ' असं नाही की एखादी भाजी चविष्ट लागली की पुन्हा बनवा.. ' मी एक स्वतंत्र मुलगी आहे. मी इतक्या दिवस घरी कशी बसू शकते?' त्यांनतर हर्ष आणि भारती एकमेकांच्या साईजवरून देखील एकमेकांना डिवचतात. (हे वाचा:कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीने डिलिव्हरीपूर्वी सोडली मालिका,सेटवरचा इमोशनल VIDEO) हर्ष म्हणतो की त्याला बॉडी-शेमिंग नकोय, परंतु गुड लुकिंगसाठी आपल्या बाळाने माझ्यावर दिसावं. यावर भारती म्हणते- 'मी इतकी वाईट दिसते? मी चांगली दिसत नाही तर तू माझ्याशी लग्न का केलेस?.' याच्या उत्तरात हर्षही मस्करीमध्ये म्हणतो- 'वेडे, माझं डोकं खराब झालेलं. त्या गोष्टीचं मला आजपर्यंत वाईट वाटत आहे आणि पश्चाताप होत आहे'. तुम्हाला सांगू इच्छितो की भारती आणि हर्षचा हा एक मजेशीर व्हिडीओ आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Comedian, Entertainment, Tv actress

    पुढील बातम्या