मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /हृतिक रोशनला 'या' वेब सीरिजसाठी 75 कोटींची ऑफर; मात्र केला नाही स्वीकार!

हृतिक रोशनला 'या' वेब सीरिजसाठी 75 कोटींची ऑफर; मात्र केला नाही स्वीकार!

प्रसिद्ध कादंबरीवर अधारित वेब सीरिजच्या (Web Series) हिंदी रिमेकसाठी (Hindi Remake) ऋतिक रोशनला (Hrithik Roshan) सुमारे 75 कोटी रुपयांची (75 Crore Offer) ऑफर देण्यात आली होती.

प्रसिद्ध कादंबरीवर अधारित वेब सीरिजच्या (Web Series) हिंदी रिमेकसाठी (Hindi Remake) ऋतिक रोशनला (Hrithik Roshan) सुमारे 75 कोटी रुपयांची (75 Crore Offer) ऑफर देण्यात आली होती.

प्रसिद्ध कादंबरीवर अधारित वेब सीरिजच्या (Web Series) हिंदी रिमेकसाठी (Hindi Remake) ऋतिक रोशनला (Hrithik Roshan) सुमारे 75 कोटी रुपयांची (75 Crore Offer) ऑफर देण्यात आली होती.

मुंबई, 25 फेब्रुवारी: बॉलीवूड अभिनेता (Bollywood actor) ऋतिक रोशनने (Hrithik Roshan) चित्रपटसृष्टीत आपलं एक खास स्थान निर्माण केलं आहे. तो आपल्या जबरदस्त डान्स, उत्तम फिटनेस आणि लूकसाठी ओळखला जातो. त्याचे चाहते केवळ बॉलिवूडपुरतेच मर्यादीत नाहीत, तर परदेशात त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. ऋतिक रोशन कदाचित कमी चित्रपट कमी करतो, पण खूप विचार केल्यानंतरच चित्रपटाची पटकथा निवडतो. त्यामुळेच त्याचे चित्रपट सामन्य चित्रपटांपेक्षा थोडेसे हटके असतात.

‘द नाईट मॅनेजर’ (The Night Manager) या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित वेब सीरिजचा (Web Series) हिंदी रिमेक (Hindi Remake) ऋतिक रोशन करणार असल्याची चर्चा होती. या वेब सीरीजसाठी ऋतिकला सुमारे 75 कोटी रुपये (75 Crore Offer) देण्याचंही निर्मात्यांनी मान्य केलं होतं. असं असलं तरी ऋतिकने ही वेब सीरीज नाकारल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्याचे चाहते देखील निराश झाले आहेत. ब्रिटनमध्ये प्रचंड गाजलेली ही वेब सीरीज ऋतिकला देखील खूप आवडली आहे. त्यामुळेच या वेब सीरीजच्या हिंदी रिमेकसाठी निर्मात्यांनी ऋतिकला ऑफर दिली होती. ऋतिकने यापूर्वी ही वेब सीरीज करण्यासाठी सहमती दर्शवली होती.

खरंतर ऋतिक रोशनने ही वेब सीरिज योग्य कारणांमुळे नाकारली आहे. यावर्षी ऋतिकचं वेळापत्रक खूपच व्यग्र आहे. त्यामुळे ऋतिकचं वेळापत्रक आणि या वेब सीरिजच्या चित्रीकरणाच्या वेळा जुळत नाही. त्यामुळे भरपूर पैसा मिळत असूनही ऋतिक रोशनने या वेब सीरीजला नकार दिला आहे. या वेब सीरीजचं शुटिंग यावर्षी एप्रिलमध्ये सुरू होणार होतं.  पण ऋतिक रोशनने यामधून अंग काढून घेतल्याने वेब सीरीजची प्रोडक्शन टीमही निराश झाली आहे.

हे ही वाचा- आईच्या आठवणीत जान्हवी कपूरची भावनिक पोस्ट; हस्ताक्षरातील चिठ्ठी केली शेअर

या भूमिकेसाठी ऋतिक रोशन हा सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे, असं संपूर्ण टीमचं मत झालं होतं. या वेब सीरीज निर्मिती प्रीती झिंटा करीत आहे. प्रीती झिंटाने ऋतिकबरोबर लक्ष्य, कोई मिल गया, मिशन काश्मीर यासांरख्या चित्रपटात काम केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Hritik Roshan, Web series