अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकीची बायको आलिया सिद्धिकीने अनेक अपेक्षांसह बिग बॉस ओटीटी 2मध्ये एंट्री घेतली होती. बिग बॉसमधून ती तिची नवी ओळख बनवू इच्छित होती.
पण आलियाच्या सगळ्या इच्छा आकांक्षा आता पाण्यात गेल्याचं म्हणू शकतो कारण आलिया बिग बॉसमधून आऊट झाली आहे.
या आठवड्यात अभिनेत्री जिया शंकर आणि आलिया इविक्शनमध्ये होते. पण आलियाला जियापेक्षा कमी वोट्स मिळाल्याने तिला घरचा रस्ता पकडावा लागला.
बिग बॉस ओटीटीमध्ये आलियाचा प्रवास उतार चढावांनी भरलेला होता. आलियाला सगळे तगडी स्पर्धक समजत होते. पण फार लवकर ती घरातून बाहेर गेली.
बिग बॉस ओटीटीच्या घरात आलियाची अभिषेक मल्हान, मनीषा रानी आणि आकांक्षा यांच्याबरोबर चांगलं बॉन्डिंग झालं होतं. तर बेबिका धुर्वेपासून ती दूर राहत होती.
घरात आलिया आणि पूजा भट्ट यांच्यात चांगलीच भांडणं झाली होती. आलिया तिच्या आणि नवाजुद्दीनच्या नात्याबद्दल तसंच त्यांच्या मुलांबद्दल सातत्यानं बोलत होती ते पूजा भट्टला आवडत नव्हतं. अनेकदा ती या गोष्टीवरून आलियावर भडकली होती.
"केवळ तुझाच घटस्फोट झालेला नाहीये. इथे अनेकांचा घटस्फोट झालाय. मी देखील घटस्फोटीत आहे. पण त्यानंतर आयुष्यात पुढे जायला पाहिजे", अशी समज पूजाने आलियाला दिली होती.