Home /News /entertainment /

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर कशी आहे शेहनाजची अवस्था? अभिनव शुक्लाने दिली माहिती

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर कशी आहे शेहनाजची अवस्था? अभिनव शुक्लाने दिली माहिती

सिद्धार्थ आणि अभिनवने 'ग्लॅमरस मॅनहंट' आणि 'मेगामॉडेल कॉन्टेस्ट'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

  मुंबई, 14 सप्टेंबर- सिद्धार्थ शुक्लाच्या(Sidharth Shukla Death) आकस्मिक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान त्याच्या अंत्यसंस्कारवेळी गर्लफ्रेंड शेहनाज गिलची (Shehnaz Gill) काही छायाचित्रे समोर आली होती. त्यामध्ये शेहनाजची अवस्था खूपच वाईट दिसत होती. त्यामुळे सर्वांनाच शेहनाजची काळजी वाटत होती. दरम्यान बिग बॉस फेम अभिनव शुक्ला(Abhinav Shukla) आणि रुबिना दिलॆकने(Rubina Dilaik) शेहनाजच्या तब्ब्येतीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
  स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनवने म्हटलं आहे, 'मी आणि रुबिना सिद्धार्थच्या आईला भेटायला गेलो होतो. तसेच तो म्हणाला कि शेहनाज आत्ता हळूहळू ठीक होत आहे. तसेच तो म्हणाला मी प्रार्थना करतो. शेहनाज आणि सिद्धार्थचं कुटुंब लवकरात लवकर यातून सावरेल. देव त्यांना इतकी ताकत देवो. शेहनाजलासुद्धा मजबूत करो.' तसेच सिद्धार्थची आईसुद्धा आत्ता नॉर्मल होत आहे'. (हे वाचा:HBD: रेल्वेत गाणं गाणारा कसा बनला विकी डोनर; वाचा आयुष्यमान खुरानाचा थक्क करणारा) सिद्धार्थ आणि अभिनवने 'ग्लॅमरस मॅनहंट' आणि 'मेगामॉडेल कॉन्टेस्ट'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तसेच अभिनव पुढे म्हणाला, 'आम्ही आमच्या करिअरची सोबतच सुरुवात केली होती. बाबुल का आंगण या मालिकेत एकत्र कामसुद्धा केलं होता. आम्हा दोघांचा एक विचित्र आणि असामान्य असा सेन्स ऑफ ह्युमर होता. आम्हा दोघानांही बाईक राईडची खूप आवड होती'. त्याच्या अशा अचानक जाण्याने मन तुटून गेलं आहे'. (हे वाचा:KBC : 'कधीच विसरू शकत नाही पहिलं प्रेम'; पुण्याच्या दीप्तीसमोर BIG B झाले व्यक्त) सिद्धार्थच्या मृत्यूंनंतर त्याची गर्लफ्रेंड शेहनाज गिलची वाईट अवस्था पाहायला मिळाली होती. तिला सावरणं कठीण होतं. तसेच मीडिया रिपोर्ट नुसार तिने अन्न-पाणी सोडलं होतं. ती कोणाशीही बोल्त नव्हती. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिची काळजी लागून राहिली होती.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Sidharth shukla

  पुढील बातम्या