मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /HBD: रेल्वेत गाणं गाणारा कसा बनला विकी डोनर; वाचा आयुष्मान खुरानाचा थक्क करणारा प्रवास

HBD: रेल्वेत गाणं गाणारा कसा बनला विकी डोनर; वाचा आयुष्मान खुरानाचा थक्क करणारा प्रवास

आयुष्यमान आज आपला ३७ वा वाढदिवस (Birthday Today) साजरा करत आहे.

आयुष्यमान आज आपला ३७ वा वाढदिवस (Birthday Today) साजरा करत आहे.

आयुष्यमान आज आपला ३७ वा वाढदिवस (Birthday Today) साजरा करत आहे.

मुंबई, 14 सप्टेंबर-  बॉलिवूडमधील(Bollywood) एक हँडसम हंक म्हणून अभिनेता आयुष्यमान खुरानाला (Ayushymann Khurana) ओळखलं जातं. आपल्या सहजसाध्या अभिनयाने त्यानं सर्वांचं मन जिंकलं आहे. मात्र हाच सुपरस्टार कधीकाळी रेल्वेमध्येसुद्धा गाणी म्हणत असे. आयुष्यमान आज आपला ३७ वा वाढदिवस (Birthday Today) साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेलं हे सत्य.

१४ सप्टेंबर १९८४ मध्ये आयुष्यमानचा जन्म चंदिगढ पंजाब येथे झाला आहे. अभिनेत्याने एम.ए इंग्लिशची डिग्री घेतली आहे. तसेच त्याने मास कम्युनिकेशनची डिग्रीसुद्धा घेतली आहे. आयुष्यमानने तब्बल ५ वर्षे गंभीर थियेटर केलं आहे. तसेच त्याने एक रेडिओ जॉकी म्हणून आपलं करिअर सुरु केलं होतं.

(हे वाचा:Kim Kardashianचा लुक पाहून घाबरले लोक; म्हणाले 'किती भयानक दिसत आहेस')

एका मुलाखतीदरम्यान आयुष्यमानने आपल्याबद्दल अनेक खुलासे केले होते, यावेळी बोलताना त्यानं सांगितलं होतं, त्याच्या कॉलेजवयात तो रेल्वेमध्ये गाणं गात होता. तो त्याच्या मित्रासोबत नेहमी चंदिगढ इंटर ट्रेनच्या सेंकड क्लास डब्यातून प्रवास करत असे. त्यावेळी तो रेल्वेमध्येच गाणी म्हणत असे. त्याला एकवेळ गाणं आवडलं म्हणून चक्क १००० रुपये काढून दिले होते.

(हे वाचा:OMG! हे ६ चित्रपट नाकारले होते कपिल शर्माने; शाहरुखलाही दिला होता नकार)

आयुष्यमानने शुजीत सरकारच्या 'विकी डोनर' या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. यामध्ये तिची सहकलाकार म्हणून अभिनेत्री यामी गौतम होती. तसेच आयुष्यमानला 'अंधाधुन' या त्याच्या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्याला ३ फिल्मफेयरसुद्धा मिळाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Ayushmann Khurrana, Entertainment