मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

KBC : 'कधीच विसरू शकत नाही पहिलं प्रेम'; पुण्याच्या दीप्तीसमोर BIG B झाले व्यक्त; पाहा VIDEO

KBC : 'कधीच विसरू शकत नाही पहिलं प्रेम'; पुण्याच्या दीप्तीसमोर BIG B झाले व्यक्त; पाहा VIDEO

कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर (Kaun banega crorepati) अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी केला पहिल्या प्रेमाचा उल्लेख.

कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर (Kaun banega crorepati) अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी केला पहिल्या प्रेमाचा उल्लेख.

कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर (Kaun banega crorepati) अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी केला पहिल्या प्रेमाचा उल्लेख.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 13 सप्टेंबर : बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांची लव्हस्टोरी नेहमी चर्चेत असते. अभिनेते बिग बी (Big B) अमिताभ बच्चनही (Amitabh bachchan) याला अपवाद नाही. अमिताभ यांचं नावही काही अभिनेत्रींसोबत जोडलं जातं. दरम्यान नुकतंच कौन बनेगा करोडपतीमध्ये (Kaun banega crorepati)  अमिताभ यांनी पहिल्या प्रेमाचा उल्लेख केला आहे. पुण्याच्या दीप्ती तुपेसमोर (Pune Dipti tupe in KBC) ते व्यक्त झाले आहेत.

पुण्याची दीप्ती तुपेही कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर बसली. दीप्तीने इथं फार मोठी रक्कम जिंकली नाही, पण आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांचं मन मात्र नक्कीच जिंकलं. विशेष म्हणजे तिने अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांना असा प्रश्न विचारला. ज्यावर उत्तर देताना अमिताभ यांनी पहिल्या प्रेमाचा उल्लेख केला.

दिप्ती तुपेसमोर केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन पहिल्या प्रेमाबाबत व्यक्त झाले. सोमवारी हा एपिसोड दाखवण्यात आला. यावेळी नेमकं दिप्तीने काय विचारलं आणि अमिताभ यांनी नेमकं काय उत्तर दिलं हे तुम्हीच पाहा.

हे वाचा - 'नारीशक्ती' म्हणत रिया चक्रवर्तीने शेअर केला ग्लॅमरस लुक, चाहत्यांनी केलं कौतुक

केबीसीमध्ये सहभागी झालेल्या दिप्तीच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. ज्यामध्ये ती आपल्या मुलांसोबत दिसते आहे. यातच ती सायकलिंग करतनाही दिसली. आपला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दिप्ती अमिताभ यांना एक प्रश्न विचारते. अमिताभ यांची फिल्म पीकूचा उल्लेख ती करते. या फिल्ममध्ये अमिताभ यांनी सायकल चालवली आहे. यासाठी त्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं की थेट सायकल चालवली, असं तिने अमिताभ यांना विचारलं.

हे वाचा - OMG! हे ६ चित्रपट नाकारले होते कपिल शर्माने; शाहरुखलाही दिला होता नकार

अमिताभ यांनी या प्रश्नावर चांगलंच उत्तर दिलं. ते म्हणाले, माणूस आयुष्यात तीन गोष्टी कधीच विसरू शकत नाही. सायकलिंग, स्विमिंग आणि... थोडं थांबून अमिताभ बनतात पहिलं प्रेम. अमिताभ यांचं हे उत्तर ऐकून सेटवर सर्वांनाच हसू येतं. सर्वजण खळखळून हसू लागतात.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Entertainment, KBC