Home /News /entertainment /

फ्रॅक्चर, पीरिअड्समध्येही शूट; Onscreen Intimate Scene ची पडद्यामागील धक्कादायक स्टोरी

फ्रॅक्चर, पीरिअड्समध्येही शूट; Onscreen Intimate Scene ची पडद्यामागील धक्कादायक स्टोरी

प्रत्यक्षात सेक्स सीन किंवा न्यूड सीन शूट करणं फार अवघड आणि आव्हानात्मक असतं.

वॉशिंग्टन, 26 नोव्हेंबर : सध्या अनेक चित्रपट, वेबसीरिजमध्ये सेक्स सीन (Sex Scenes) किंवा न्यूड सीन (Nude Scene) समाविष्ट असतात. चित्रपटात प्रसंगानुसार आणि कथानकाची गरज म्हणून सेक्स सीनचा समावेश केलेला असतो (How Sex Scenes shoot). ऑनस्क्रिन दिसणारं हे सेक्स खरंच केलं जातं का? हे सीन कसे शूट केले जातात? (Onscreen Sex scenes) असे सीन देताना या कलाकारांना काहीच वाटत नाही का? असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात. अशाच ऑनस्क्रिन इंटिमेट सीनची (Intimate Scene) पडद्यामागील धक्कादायक स्टोरी आता समोर आली आहे. प्रत्यक्षात सेक्स सीन किंवा न्यूड सीन शूट करणं फार अवघड आणि आव्हानात्मक असतं. हे सीन अधिक आकर्षक, वास्तववादी आणि सुंदर व्हावेत यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. कोणताही इंटिमेट सीन (Intimate Scene) पाहताना तो प्रेक्षकांना अगदी खराखुरा वाटावा यासाठी प्रॉडक्शन विभागातले अनेक तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट, कॉस्च्युम डिझायनर (Costume Designer) आदी घटक मोठी मेहनत घेत असतात. अर्थात यात सर्वांत महत्त्वाचं योगदान असतं ते पडद्यावरच्या कलाकारांचं. रिपोर्टनुसार असे सीन शूट करताना त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. सेक्स सीनची कोरिओग्राफी न्यूयॉर्कमधली कोरिओग्राफर ट्रिसीया ब्रुक (Tricia Brouk) यांचा असे सीन्स कोरिओग्राफ (Choreograph) करण्यात विशेष हातखंडा आहे. हुकअप सीन शूट करण्यापूर्वी ती तिच्या पार्टनरसोबत तो सीन करून दाखवते. त्यानंतर अभिनेता आणि अभिनेत्रीला सीन शिकवते. त्यामुळे असा सीन करताना कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्रीला असुरक्षित वाटत नाही. हॉलिवूडमध्ये इंटिमसी कोरिओग्राफर असतात. सेक्स सीन्स कोरिओग्राफ करणं हे त्याचं मुख्य काम असतं. हे कोरिओग्राफर एखादा सेक्स सीन अगदी स्टंट सीन किंवा डान्स सीन्ससारखा चित्रित करतात. सेक्स सीन शूट करताना काय काय केलं जातं? आज अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना न्यूड सीन्स देताना कोणतीही अडचण येत नाही. परंतु, असेही काही कलाकार असतात की ज्यांना हे सीन्स करताना अडचण वाटते. अशा कलाकारांसाठी कॉक सॉक किंवा स्नॅच पॅचसारख्या गोष्टी वापरल्या जातात. यामुळे एखादा अभिनेता कॉक सॉकच्या मदतीनं त्याचा प्रायव्हेट पार्ट (Private Part) लपवू शकतो. हे वाचा -  REEL मध्येसुद्धा REAL; 6 फिल्ममध्ये हिरो-हिरोईननं कॅमेऱ्यासमोर केला SEX एखाद्या सीनसाठी कलाकाराला न्यूड व्हावं लागतं तेव्हा कॉश्च्युम किंवा अन्य विभागातली एखादी व्यक्ती बाथरोब (Bathrobe) आणि स्लीपर आदी साहित्य घेऊन सीन झाल्यावर त्या कलाकाराच्या अंगावर लपेटण्यासाठी तयार राहते. सेक्स सीन शूट झाल्यानंतर संबंधित कलाकाराला बाथरोबमध्ये लपेटलं जातं. जेव्हा शूटिंग दीर्घ काळ केलं जाणार असतं, त्यावेळी कलाकारांसाठी सेक्स सीन्स करण्याकरता बॉडी डबल्सचा (Body Doubles) किंवा डमी व्यक्तीचा वापर केला जातो. सेक्स सीन करताना कलाकारांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? एका अभिनेत्याला हॉलिवूडच्या हंकसाठी त्याच्या आगामी टीव्ही सीरिजमधला सेक्स सीन शूट करण्याकरिता बोलवण्यात आलं. या वेळी आलेला अनुभव शेअर करताना त्यानं सांगितलं, की `मला कामसूत्रातल्या अनेक पोझिशन कराव्या लागल्या. शूटिंग पाच ते सहा तास चाललं. शेवटी माझ्या दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली. जखमा झाल्या. काही दिवस माझे गुडघे प्लॅस्टरमध्ये होते.` "सेक्स सीन करण्यापूर्वी मी माझ्या सहकलाकाराला विश्वासात घेतो. जर मला इरेक्शन (Erection) झालं तर माफ कर आणि नाही झालं तरी माफ कर. कारण सीन शूट करताना मला चुकून इरेक्शन झालं तर ती घाबरून जाऊ नये आणि नाही झालं तर ती स्वतःला रिजेक्टेड समजू नये, आणि अडचणींचा सामना करावा लागू नये, अशी यामागील भूमिका असते", असं या कलाकारानं सांगितलं. हे वाचा - Body Builder ने केलं चक्क बाहुलीशी लग्न; हनीमूनही केला एन्जॉय; पाहा VIDEO "चित्रपटातले सेक्स सीन्स शूट करताना महिला कलाकारांना लॅडिंग स्ट्रिपसारख्या गोष्टी परिधान कराव्या लागतात. ही लॅडिंग स्ट्रिप डबल टेप किंवा बिकिनी बाइटसारख्या गोष्टींनी चिटकवली जाते. एखाद्या अभिनेत्रीला पीरियड्स सुरू असले तरी इंटिमेट सीन्स शूट करावे लागतात", असं ऑन सेट कॉश्च्युम डिझायनर सारा बास्टानं सांगितलं. सेक्स सीनमधील मेकअप मेकअप आर्टिस्ट रोसिओ जहानबक्ष म्हणते, की "एखाद्या सीनमध्ये कलाकार घामाघूम झाल्याचं आपण पाहतो. कलाकाराला किती घाम (Sweat) आलेला दिसावा, हे दिग्दर्शकानं ठरवलेलं असतं. मला केवळ तेलकट त्वचेचा लूक द्यायचा असेल तर मी व्हॅसलीनचा वापर करते. संपूर्ण शरीर असं दाखवायचं असेल तर बॉडी ऑइल पाण्यात मिसळून त्याचा वापर यासाठी केला जातो. यासाठी मी अल्ट्रा स्वेट नावाचं बॉडी जेल आणि मेहरॉन स्वेट अँड टिअर्सचा वापर करते" 'हाऊ टू गेट अवे विथ मर्डर' सीरिजमधल्या रोमँटिक सीन्सबाबत अभिनेत्री व्हायोला डाव्हिसनं (Viola Davis) सांगितलं, की 'ट्रू ब्लड' चित्रपटात काम केलेली कलाकार ब्रिगेट्टी मायरे शार्पी मेकअपवर स्प्रे टॅन करण्यास प्राधान्य देते. तुम्ही स्प्रे टॅनचा वापर केला तर तुम्हाला एका वेगळ्याच त्वचेचा आणि जास्त कपडे परिधान केल्याचा अनुभव मिळतो. त्यातही हा स्प्रे ड्राय असेल तर फर्निचर, कपडे, तसंच सहकलाकाराच्या अंगाला लागत नाही" हे वाचा - काय म्हणावं याला! हटके प्रपोज करण्याच्या नादात तरुणाने Private part ची लावली वाट मेरकिन्स (Merkins) नावाच्या प्रायव्हेट पार्ट कव्हरचा वापर हॉलीवूडमध्ये सर्रास होतो. याला प्यूबिक हेअर किंवा प्युबिक विग्जदेखील म्हणतात. अनेक अभिनेत्री प्युबिक हेअरचा वापर करतात. अभिनेत्याला आरामदायी वाटणं हा याचा पहिला उद्देश असतो. यामुळे अभिनेत्याला अधिक सेक्सी वाटतं. नेटफ्लिक्सवरच्या 'क्रेझी एक्स गर्लफ्रेंड' या सीरिजमध्ये काम केलेला प्रॉप मास्टर टॉम काहिल म्हणतो, की "चित्रपटासाठी किंवा सीरिजसाठी कोणतं सेक्स टॉय (Sex Toys) योग्य ठरेल हे निवडण्याची जबाबदारी माझ्या डिपार्टमेंटकडे असते. ब्रॉडकास्टचे नियम आणि प्रॅक्टिसनुसार टीव्ही चॅनेल कोणती टॉइज ऑनस्क्रीन दाखवायची याविषयी विशेष काळजी घेतात. मला एकदा हेन पार्टीचं दृश्य मिळालं होतं. या सीनमध्ये युवतींना सेक्स टॉइजचा वापर करायचा असतो. यासाठी मी वेगवेगळ्या 100 टॉइजचे फोटो पाठवले होते. त्यातली केवळ 8 ते 10 टॉइज वापरली गेली. यात टिपिकल दिसणारा व्हायब्रेटर किंवा डिल्डो नव्हता"
First published:

Tags: Film, Sex, Shooting

पुढील बातम्या