‘त्या’ एका चुकीमुळं फरदीन खानचं करिअर संपलं; रातोरात झाला बेरोजगार

‘त्या’ एका चुकीमुळं फरदीन खानचं करिअर संपलं; रातोरात झाला बेरोजगार

एका चुकीमुळं फरदीनच्या करिअरला उतरी कळा लागली. प्रेक्षकांमध्ये त्याचं नाव खराब झालं. त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली. (Fardeen Khans Bollywood career end)

  • Share this:

मुंबई 8 मार्च: फरदीन खान (Fardeen Khan) हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जायचा. ‘नो एण्ट्री’, ‘लव्ह के लिये कुछ भी करेगा’, फिदा, ‘हे बेबी’ यांसारख्या दमदार चित्रपटातून त्यानं स्वत:चा असा एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला होता. परंतु एका चुकीमुळं फरदीनच्या करिअरला उतरी कळा लागली. प्रेक्षकांमध्ये त्याचं नाव खराब झालं. त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली. (Fardeen Khan's Bollywood career end) त्यामुळं निर्मात्यांनी देखील चित्रपटात काम देण्यास त्याला नकार दिला. परिणामी कधीकाळी लोकप्रिय कलाकारांच्या यादीत झळकणार फरदीन एकाएकी बॉलिवूडमधून गायब झाला.

2001 साली ड्रग्ज प्रकरणात त्याचं नाव समोर आलं होतं. त्यावेळी त्याच्याविरोधात कुठलाही पुरावा न सापडल्यामुळं पोलिसांनी त्याला सोडून दिलं. परंतु तीन वर्षानंतर पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरणात तो अडकला. यावेळी एका ड्रग्ज रॅकेटद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याची वैद्यकिय तपासणी देखील करण्यात आली. अन् या तपासणीत तो अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर फरदीनला काही महिन्यांची शिक्षा देखील झाली होती. परंतु या सर्व प्रकरणामुळं त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. त्याचा चाहता वर्ग दिवसेंदिवस कमी होऊ लागला. निर्मात्यांनी देखील त्याला काम देण्यास नकार दिला. आपलं फिल्मी करिअर डोळ्यांसमोर ढासळतंय अन् आपण काहीच करु शकत नाही हे पाहून फरदीन नैराश्येत गेला. यामुळं त्याचं वजन देखील वाढलं. परिणामी एकाएकी तो बॉलिवूडमधून गायब झाला.

अवश्य पाहा - फरदीनचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क; पुनरागमनासाठी 35 किलो वजन केलं कमी

10 वर्षांपूर्वी फरदीननं शेवटचा रुपेरी पडद्यावर झळकला होता. तेव्हापासून तो चंदेरी दुनियेपासून लांब आहे. मात्र आता त्यानं पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यानं आपलं 35 किलो वजन कमी केलं आहे. त्याच्या या नव्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Published by: Mandar Gurav
First published: March 8, 2021, 11:01 AM IST

ताज्या बातम्या