मुंबई 4 जून: अशोक सराफ (Ashok Saraf) हे मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकं मराठी प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. त्यांचे ‘बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’, ‘धुमधडाका’, ‘एक डाव भुताचा’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ (‘Banwa Banwi’, ‘Gammat Jammat’, ‘Dhumdhadaka’, ‘Ek Daav Bhutacha’, ‘Navri Mile Navryala’) असे कित्येक चित्रपट आहेत. जे आजही तितक्याच आवडीनं पाहिले जातात. विशेष म्हणजे गेले अनेक वर्ष कलाविश्वामध्ये वावर असणाऱ्या अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये सारेच जण ‘मामा’ या टोपण नावानं हाक मारतात. मात्र त्यांना ‘मामा’ का म्हणतात? हे फार कमी जणांनाच माहित आहे. आज आशोक सराफ यांचा वाढदिवस आहे त्या निमित्तानं जाणून घेऊयात त्यांच्या या खास नावाविषयी...
अशोक सराफ यांचा जन्म 1947 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. ते मुळचे बेळगावचे असून दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी भागात त्यांचं बालपण गेलं. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. वयाच्या 18 व्या वर्षी वि. वा. शिरवाडकरांच्या ‘ययाती’ आणि ‘देवयानी’ या नाटकांमधून त्यांनी अभिनयसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी काही संगीत नाटकांतूनदेखील भूमिका केल्या आहेत.
या महिलेमुळं लक्ष्मीकांत बेर्डे झाले सुपरस्टार; पाहा कॉमेडी किंगचे न ऐकलेले किस्से
नाटक, चित्रपट, मालिका असा प्रवास करत असतांनाच त्यांना ‘मामा’ हे नाव पडलं. त्याचं हे नाव पडण्यामागेदेखील रंजक किस्सा आहे. काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरामन होता. तो अनेक वेळा सेटवर त्याच्या मुलीला घेऊन येत असते. त्यावेळी ती लहान मुलगी सतत अशोक सराफ यांच्याकडे बोट दाखवून हे कोण? असा प्रश्न आपल्या वडिलांना विचारत असे. त्यावेळी प्रकाशने तिला हे अशोक मामा असून तू त्यांना ‘अशोक मामा’ म्हणत जा असं सांगितलं. त्यानंतर त्या मुलीच्या निमित्तानं सेटवरील सर्वच जण त्यांना मामा अशी हाक मारु लागले. पुढे हे नाव इतकं प्रसिद्ध झालं की मनोरंजनसृष्टीतील प्रत्येक जण त्यांना मामा अशीच हाक मारु लागलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actor, Bollywood actor, Marathi cinema