मुंबई, 17 ऑगस्ट : प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही टॅलेंट (Talent) असतं. काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक व्यक्तींना आपलं टॅलेंट सादर करायची संधी मिळायचीच नाही. मात्र टेलिव्हिजनवरच्या (Television) विविध टॅलेंट शोंमुळे (Talent Show) आता परिस्थिती बदलली आहे. विविध शोजच्या माध्यमातून तुम्ही तुमचं टॅलेंट जगासमोर आणू शकता. संगीत क्षेत्रात नाव कमावू इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी हे शो महत्त्वाचं माध्यम ठरू पाहत आहेत. अशाच रिअॅलिटी शो जिंकून प्रसिद्ध झालेली गायिका नेहा कक्कर (Singer Neha Kakkar). सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे आणि इंडियन आयडल (Indian idol) रिअॅलिटी शोची परीक्षकही (Judge) होती. संगीत, गायनक्षेत्रात नाव कमावू इच्छिणाऱ्या, तसंच अशा रिअॅलिटी शोजमध्ये विजेते होऊ इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांना नेहाने कानमंत्र दिला आहे. सध्या नेहा सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपल्या गाण्यांचं प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी तिचं `दिल का करार` हे गाणं लॉंच झाले. हे गाणं लोकांच्या पसंतीस उतरलं आहे. गाण्याच्या प्रमोशनव्यतिरिक्त नेहा सोशल मीडियाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातल्या नवोदित टॅलेंटला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देत आहे. नवोदितांनी रिअॅलिटी शोमध्ये यशस्वी कसं व्हायचं, संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी कसे परिश्रम घ्यावेत, याविषयी नेहाचा एक मार्गदर्शनपर व्हिडिओ अलीकडेच शेअर झाला आहे. त्यात तिने काही प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. या व्हिडिओला नेटिझन्सचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
गायकाने आपला आवाज चांगला कसा ठेवायचा, असा प्रश्न नेहाला विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, की शक्य तितका रियाज करावा, सराव करावा. सराव तुम्हाला सर्वोत्तम ठरण्यासाठी मदत करतो. कमी बोलावं, मोठ्यानं बोलू नये, तसंच ओरडू नये, असा सल्ला नेहाने दिला. हे वाचा - राखी सावंतचा काही नेम नाही; चक्क स्पायडर वुमन बनून फिरतेय ड्रामा क्वीन बॉलिवूडमध्ये गायक ( Bollywood Singer) म्हणून करिअर कसं करता येईल, या प्रश्नावर उत्तर देताना नेहा म्हणाली, की ‘यासाठी तुम्ही एखाद्या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये सहभागी व्हावं. मी याच माध्यमातून आले आहे. या व्यतिरिक्त एखाद्या टॅलेंट प्लॅटफॉर्मवर आपलं टॅलेंट सादर करावं.’ रिअॅलिटी शोमध्ये विजेता होण्यासाठी काय करावं, या प्रश्नावर उत्तर देताना नेहा म्हणाली, ‘यासाठी तुम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागतील. शोच्या पहिल्याच राउंडमध्ये आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करावा. कारण पहिल्या राउंडमध्ये सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला तरच तुम्ही दुसऱ्या राउंडमध्ये दाखल होऊ शकता. आपल्या वैयक्तिक प्रवासाची कहाणी ऐकून अशा शोमध्ये घेतलं जातं, असा समज असेल तर तो काढून टाकावा. अशा शोमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमचं टॅलेंटच दाखवावं लागेल.’ हे वाचा - अखेर शिल्पा शेट्टीची ‘सुपर डान्सर’मध्ये वापसी; Raj Kundra प्रकरणानंतर टीव्हीवर.. हा व्हिडिओ (Video) शेअर करताना नेहाने लिहिलं आहे, की ‘माझ्या कोर्सला युझर्सनी भरभरून प्रतिसाद दिल्यानं मी खूप खूश आहे. तुमच्या मनात या विषयाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे प्रश्नोत्तरांवर आधारित व्हिडिओ तयार करण्याचे मी ठरवलं. माझ्या उत्तरांमुळे तुमच्या सर्व शंका दूर झाल्या असतील अशी आशा मला आहे.’ काही दिवसांपूर्वी नेहा प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा होती. इंडियन आयडॉल 12 या शोच्या काही एपिसोडमध्ये ती न दिसल्याने ही चर्चा अधिकच रंगली होती. या शोची ती परीक्षक होती. तिच्या जागी तिची बहिण सोनू कक्कर या शोमध्ये दिसली. परंतु, एका सार्वजनिक ठिकाणी फॅन्सना तिचं दर्शन झाल्याने ती प्रेग्नंट असावी, असा तर्क लावण्यात आला होता.