VIDEO : 'अक्षय कुमार खोटारडा आहे...', Housefull 4 च्या कलाकारांची सटकली!

VIDEO : 'अक्षय कुमार खोटारडा आहे...', Housefull 4 च्या कलाकारांची सटकली!

'हाउसफुल 4' मधील सहकलाकार बॉबी देओल आणि रितेश देशमुख यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते अक्षय कुमारवर राग काढताना दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर : अक्षय कुमार त्याच्या फिटनेस आणि सकाळी लवकर उठण्याच्या सवयीसाठी ओळखला जातो. अक्षय नेहमीच सर्वात आधी सिनेमाच्या सेटवर पोहोचतो आणि मग त्याचे परिणाम बाकी सहकलाकरांना भोगावे लागतात. पण अक्षय एवढा मोठा स्टार असल्यानं त्याच्या समोर कोणीच काही बोलत नाही. पण त्याच्या आगामी सिनेमा 'हाउसफुल 4' मधील सहकलाकार बॉबी देओल आणि रितेश देशमुख यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते अक्षय कुमारवर राग काढताना दिसत आहेत.

रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात ते दोघं फक्त अक्षय वरील रागच व्यक्त करत नाहीत तर अक्षय कुमारला खोटारडा म्हणत त्यांनी त्याची पोलखोल सुद्धा केली आहे. अक्षयच्या लवकरच्या उठण्याच्या सवयीमुळे नेहमी रात्री किंवा दुपारी होणारं हे शूट कपिल शर्मानं सकाळी 7.30 ला ठेवलं होतं. त्यावेळचा सेटवरील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सलमान-ऐश्वर्याचा हा किस्सा तुम्ही वाचलाच नसेल, बॉलिवूड अभिनेत्रीनं उलगडलं गुपित!

 

View this post on Instagram

 

Kahan hai @akshaykumar ??? #Housefull4

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

या व्हिडीओमध्ये रितेश सांगतो, 'आम्ही कपिल शर्मा शोसाठी आलो आहोत. मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की, मी आणि बॉबी इथं सर्वात आधी पोहोचलो आहोत आणि जो सेटवर नेहमीच सर्वात आधी येतो, ज्यानं हे शूटिंग सकाळी 7.30ला ठेवायला लावलं आहे.' तेवढ्यात बॉबी मध्येच म्हणतो, जो नेहमी पंक्चुअल आहे. पुन्हा रितेश म्हणतो, 'जेवढ्याही मुलाखती झाल्या त्यात सर्वांनी प्रेमानं सांगितलं कि, अक्षय कुमार सर्वात पंक्चुअल माणूस आहे. या सर्व अफवा आहेत. हे सर्व खोटं आहे. अक्षय कुमार खोटारडा आहे.' त्यावर बॉबी देओल पंजाबी अंदाजात म्हणतो, 'कुत्ते, कमीने, कित्‍थे है तू..'

KBC 11 : करोडपती झाल्यावर बिघडली गौतम झा यांची तब्बेत, वाचा नेमकं काय घडलं

कपिल शर्माच्या सेटवर 'हाउसफुल 4' पोहोचली होती तो कपिल मात्र लेट नाइट शूट रात्रभर जाग राहण्यासाठी ओळखला जातो. पण अक्षयसाठी त्यालाही पहाटे सेटवर यावं लागलं. याआधी कपिलनं सुद्धा सकाळी लवकर उठण्याचा अनुभव शेअर केला होता. कपिल शर्माचा शो हा सिनेमांच्या प्रमोशनसाठी मोठा प्लॅटफॉर्म मानला जातो. जवळपास प्रत्येक अभिनेता आपल्या सिनेमाचं प्रमोशन या शोमध्ये करतो. त्याप्रमाणे अक्षय सुद्धा त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनासाठी संपूर्ण टीमसोबत या कपिल शर्मा शोमध्ये पोहोचला होता.

Indian Idol च्या ऑडिशनमध्ये स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं KISS केलं आणि...

==============================================

VIDEO: अजगराच्या विळख्यातून मजुराच्या सुटकेचा थरार

First published: October 17, 2019, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading