मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sunny Leone च्या वेब सीरीजच्या सेटवर गुंडाचा राडा; दिग्दर्शक विक्रम भट्टकडे केली पैशांची मागणी

Sunny Leone च्या वेब सीरीजच्या सेटवर गुंडाचा राडा; दिग्दर्शक विक्रम भट्टकडे केली पैशांची मागणी

सनी लिओनीच्या आगामी वेब सीरीजच्या सेटवर काही अज्ञात गुंडानी जबरदस्त राडा घालून शूटिंग बंद पाडलं आहे. याशिवाय या गुंडांनी दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याकडे पैशाचीही मागणीही केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 12 फेब्रुवारी: गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood actress) सनी लिओनी (Sunny leone) वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिच्यावर आर्थिक फसवणूकीचे (Financial Fraud) आरोप लागले होते. केरळच्या एका इव्हेंट कंपनीने तिच्यावर 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवला होता. यानंतर हे प्रकरण केरळ उच्च न्यायालयात गेलं होतं. याप्रकरणात सनी लिओनीला कोर्टाने दिलासा दिला असला तरी प्रकरण अजून शमलं नाही. अशातच आता आणखी एका कारणामुळे ती चर्चेत आली आहे. तिच्या 'अनामिका' या वेब सीरीजच्या (Anamika Web series) सेटवर काही गुंडानी राडा (Hooliganism) घातल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सनी लिओनीच्या आगामी वेब सीरीजच्या सेटवर काही अज्ञात गुंडानी जबरदस्त राडा घालून शूटिंग बंद पाडलं होतं. याशिवाय या गुंडांनी दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याकडे पैशाचीही मागणीही केली होती. गुंडांनी सेटवर गोंधळ घातल्यानंतर 'अनामिका' वेब शोचे दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याकडे केवळ 1 - 2 नव्हे, तर तब्बल 38 लाख रुपयांची मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे.

(वाचा - सलमान आणि कॅटरिनासाठी इमरान हाश्मी झाला खलनायक, वाचा काय आहे कारण)

दरम्यान, या प्रकरणाला विक्रम भट्टसोबतच्या वादाची जुनी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर असा आरोप आहे की, त्यांनी काही अ‍ॅक्शन सीन्ससाठी दिग्दर्शक अब्बास अली मोघल यांच्यासोबत काम केलं होतं. पण काम झाल्यानंतर या कामाची फी विक्रम भट्ट यांनी दिली नाही. ज्यामुळे या वादाला तोंड फुटलं आहे. या संबंधित प्रकरणाचा खुलासा दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी स्वतः एका न्यूज पोर्टलशी बोलताना केला आहे.

(वाचा - एका पॉर्न व्हिडीओतून 'इतके' पैसे कमवायची गहना वशिष्ठ, पोलिसांसमोर मोठे खुलासे)

या संपूर्ण घटनेविषयी माहिती देताना विक्रम भट्ट म्हणाले की, 'या घटनेनंतर मला एकप्रकारे धक्काच बसला आहे. त्यावेळी मला काय करावं हेच सुचलं नाही. माझी पहिली जबाबदारी माझ्या क्रूला आणि सनी लिओनीला सुरक्षित ठेवणं ही होती. त्यांनी मला त्या चेकचा फोटो अब्बासला पाठवायला सांगितला, जो मी त्याला पाठवणारच होतो. पण ते लोकं माझ्याकडे बँक चेकची मागणी करू लागले. त्यावेळी सेटवर इतका गोंधळ वाढला की, त्या दिवशीचं चित्रीकरणचं होऊ शकलं नाही. पण या घटनेनंतर आता मी अब्बास अली मोघलविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहे, असंही विक्रम भट्ट यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

First published:

Tags: Anamika web series, Bollywood actress, Financial fraud, Money, Star celebraties, Sunny Leone, Vikram bhatt