मुंबई 12 फेब्रुवारी : सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif)यांचा आगामी टायगर 3 (Tiger 3) सिनेमा सतत चर्चेत आहे. चित्रपटाचं चित्रीकरण याच वर्षी मार्च महिन्यात सुरू होणार आहेत. याच दरम्यान या सिनेमाबाबतची मोठी बातमी आता समोर आली आहे. टायगर 3 चे निर्माता यशराज फिल्मस यांना सिनेमात खलनायकाच्या भूमिकेसाठी नवा चेहरा हवा आहे. अशी माहिती समोर आली आहे, की या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) याची खलनायकाच्या भूमिकेसाठी वर्णी लागली आहे.
इमरान हाश्मी (Emraan Hashmi) या चित्रपटात सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांना टक्कर देताना दिसणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, इमरानला या सिनेमातील खलनायकाच्या भूमिकेसाठी घेतलं गेलं आहे. इमरान एक उत्तम अभिनेता असून तो हा रोल चांगल्या पद्धतीनं साकारेल, असा निर्मात्यांना विश्वास आहे.
असंही म्हटलं जात आहे, की टायगर 3 सिनेमाचं शाहरुख खानच्या पठान सिनेमासोबतही कनेक्शन असणार आहे. टायगर 3 सिनेमाची सुरूवात तिथूनच होणार आहे, जिथे पठान सिनेमाचा शेवट दाखवण्यात येणार आहे. तर, पठान सिनेमात सलमानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
टायगर 3 सिनेमाचं पहिलं शेड्यूल मुंबईमध्ये शूट होणार आहे. मार्चपासूनच इमरान हाश्मीदेखील या सिनेमाचं चित्रीकरण सुरू करणार आहे. चित्रपटाचं सुरूवातीचं शूट यशराज स्टूडियोजमध्ये केलं जाईल. इथे इमरान हाश्मी, सलमान खान आणि कॅटरिना कैफ सोबत काही सीन शूट करतील. प्रेक्षकांनी सलमान खान आणि कॅटरिनाच्या जोडीला याआधी युवराज, पार्टनर, मैंने प्यार क्यों किया, एक था टायगर, टायगर जिंदा है आणि भारतमध्ये एकत्र पाहिलं आहे. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळते. याच कारणामुळे टायगर 3 सिनेमाही चर्चेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Katrina kaif, Salman khan, Upcoming movie