दिग्गज बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची लेक आणि प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नेंट आहे. अलीकडेच, सोनमने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना याची माहिती दिली होती. तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर पती आनंद अहुजासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला होता. तसेच प्रेग्नेंसीचा खुलासा केला होता. ज्यानंतर दोघांनाही सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसह कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
सोनमचा पती आनंद अहुजाने मुंबईत एक नवीन स्टोअर उघडलं आहे. बुधवारी त्याचा उदघाटन समारंभ झाला. यावेळी सोनम उद्घाटन समारंभात दिसली.