जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Rihanna Boyfriend Arrested: प्रसिद्ध गायिकेचा बॉयफ्रेंड गजाआड! गोळी झाडून एकावर हल्ला केल्याचा आरोप

Rihanna Boyfriend Arrested: प्रसिद्ध गायिकेचा बॉयफ्रेंड गजाआड! गोळी झाडून एकावर हल्ला केल्याचा आरोप

Rihanna Boyfriend Arrested: प्रसिद्ध गायिकेचा बॉयफ्रेंड गजाआड! गोळी झाडून एकावर हल्ला केल्याचा आरोप

हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना (Rihanna) तिच्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. मात्र या काळात तिच्यावर आणखी एक समस्या उद्धवली आहे. या पॉपस्टारचा बॉयफ्रेंड रॅपर A$AP Rocky ला लॉस एंजिलस एअरपोर्टवर अटक करण्यात आली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 एप्रिल: हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना (Rihanna) तिच्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. मात्र या काळात तिच्यावर आणखी एक समस्या उद्धवली आहे. या पॉपस्टारचा बॉयफ्रेंड रॅपर A$AP Rocky ला लॉस एंजिलस एअरपोर्टवर अटक करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये तो सहभागी असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रॉकी बार्बाडोसवरुन त्याची ट्रीप पूर्ण करून लॉस एंजलिसमध्ये परतता होता, तेव्हाच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लॉस एंजलिस पोलिसांनी याप्रकरणी प्रेस रीलिज जारी केले आगे. या प्रेस रीलिजमधील माहितीनुसार रॉकीने नोव्हेंबर 2021 मध्ये एका व्यक्तीवर खतरनाक हत्याराने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर इंटरनॅशनल मीडिया आणि रिहानाच्या चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. रिहानाच्या फॅन्सना आता तिच्या आरोग्याची काळजी आहे. सोशल मीडियावर देखील या घटनेबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे. हे वाचा- VIDEO: पॅपाराझींवर सारा अली खान भडकली, गाडीचा दरवाजा तोंडावर केला बंद काय आहे प्रकरण? A$AP Rocky चे खरे नाव Rakim Mayers असे आहे. 6 नोव्हेंबर 2021 रोजी Vista Del Mar आणि Selma Ave जवळ रात्री 10.15 वाजता एक हल्ला झाला होता. याप्रकरणात LAPD ला रॉकीचा सहभाग असल्याचा संशय आबे. पोलिसांकडून अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रेस रीलिजनुसार दोन लोकं जी एकमेकांना ओळखत होती त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्यानंतर एका संशयिताने गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर आरोपीसह दोन जण पळून गेले. या प्रकरणातील तिसरा संशयित म्हणून आसाप रॉकी तपासाच्या कक्षेत आला आहे. याआधीही स्टॉकहोम स्ट्रीम फाईटमध्ये रॉकी दोषी ठरला होता. हे वाचा- तीन महिन्यानंतर प्रियांका-निकच्या लेकीचं समजलं नाव, असा आहे नावाचा अर्थ आई बनणार आहे रिहाना रिहाना सध्या प्रेग्नंट आहे. रिहाना आणि A$AP रॉकी लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे पालक बनण्याची तयारी करत होते. रिहाना तिच्या प्रेग्नेंसीच्या निवडीमुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी हे दोघे वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र नंतर दोघांचे एकत्र फोटो समोर आल्याने या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: rihanna
  • First Published :
जाहिरात
जाहिरात