...जेव्हा जया बच्चन यांनी लावला होता रेखा यांना रंग, हा खास VIDEO पाहिलात का?

...जेव्हा जया बच्चन यांनी लावला होता रेखा यांना रंग, हा खास VIDEO पाहिलात का?

बॉलिवूडमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान, होळीच्या निमित्ताने रेखा आणि जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 10 मार्च : बॉलिवूडमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बॉलिवूडमधील बहुतेक सर्व सेलेब्रिटी होळीच्या उत्सवाचा खूप आनंद घेतात.दरम्यान, होळीच्या निमित्ताने रेखा आणि जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात रेखा आणि जया एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत.

रेखा आणि जया यांचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आहे, यश चोप्रा यांच्या सिलसिला या सिनेमातला. यश राज चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करून पुन्हा एकदा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

जया यांनी लावला होता रेखा यांना रंग

सिलसिला चित्रपटाच्या या व्हिडिओमध्ये जया बच्चन रेखा यांना होळीच्या शुभेच्छा देत एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत. या दरम्यान, जया आणि रेखा दोघेही खूप आनंदी आहेत. जया रेखाला सांगते की तिच्यावर होळीचा रंग खूपच सुंदर दिसत आहे. जया बच्चन आणि रेखा व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, शशी कपूर, संजीव कुमार, कुलभूषण खरबंदा सारख्या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते.

वाचा-होळीमध्ये अनेक वर्षांपासून याच गाण्यांची धूम, एका क्लिकवर अशी मिळेल Playlist

वाचा-होळीसाठी बेस्ट आऊटफिट, विविध रंगांमध्ये दिसा स्टायलिश

1981मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची बरीच चर्चा होती. सिलसिला चित्रपटाची कथा ही विवाहबाह्य संबंधांवर आधारित होती. चित्रपटात अमिताभ-रेखा आणि जयाच्या नात्यामधील गोंधळ चांगलाच दाखवला गेला होता. 1981 मधील रंग बरसे हे चित्रपटातील गाणेही होळीतील सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक आहे. हे गाणे अमिताभ बच्चन यांनी गायले आहे. हा चित्रपट अमिताभ-रेखा-जया यांचा शेवटचा चित्रपट होता.

वाचा-होळीमध्ये पिण्यासाठी मजेदार वाटणारी थंडाई, आरोग्यासाठी आहे गुणकारी

वाचा-लाल, पिवळा, गुलाबी; वास्तूशास्त्रानुसार कोणत्या रंगांनी खेळाल होळी?

असेही म्हटले जाते की ज्यावेळी सिलसिला हा सिनेमा अमिताभ बच्चन, जया आणि रेखा यांच्याती संघर्षवर आधारित होता. यश चोप्राच्या संस्मरणीय चित्रपटांमध्ये त्याचा समावेश आहे. त्याची गाणी अजूनही लोकप्रिय आहेत.

First published: March 10, 2020, 9:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading