Home /News /entertainment /

रंग बरसे! होळीमध्ये अनेक वर्षांपासून बॉलिवूडच्या याच गाण्यांची धूम, एका क्लिकवर अशी मिळेल Playlist

रंग बरसे! होळीमध्ये अनेक वर्षांपासून बॉलिवूडच्या याच गाण्यांची धूम, एका क्लिकवर अशी मिळेल Playlist

रंगाचा सण होळी उद्यावर येऊन ठेपला आहे आणि सर्वजण होळी खेळण्यासाठी सज्ज आहेत. होळी म्हटलं की रंग, गोडधोड हे सर्व आलंच, पण त्याबरोबर महत्त्वाची आहेत ती होळीची गाणी. होळीच्या ठराविक गाण्याची जादू आजही कायम आहे.

    मुंबई, 09 मार्च : रंगाचा सण होळी उद्यावर येऊन ठेपला आहे आणि सर्वजण होळी खेळण्यासाठी सज्ज आहेत. होळी म्हटलं की रंग, गोडधोड हे सर्व आलंच, पण त्याबरोबर महत्त्वाची आहेत ती होळीची गाणी. गेली अनेक वर्ष बॉलिवुडमधील अनेक गाणी होळी सणासाठी बनवण्यात आली आहेत. अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, अक्षर कुमार यांना सुद्धा होळीबाबतचं गाण बनवण्याचा मोह आवरला नाही. दरवर्षी रंगाच्या सणांची नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. पण या ठराविक गाण्याची जादू आहे, ती आजही कायम आहे. बागबान चित्रपटातील अमिताभ आणि हेमा मालिनी यांचं गाणं नसेल तर खरंच तुमची होळी पूर्ण होईल का? अमिताभ आणि होळीची गाणी असं एक समीकरण आहे. 'रंग बरसे' अमिताभ यांच्या सुपरहिट गाण्यांपैकी एक वक्त सिनेमातील 'Lets play holi'हे गाणं देखील विशेष गाजलं होतं. यामध्ये अक्षय कुमार आणि प्रियांकाचा 'होळी रोमान्स' पाहायला मिळाला होता शाहरुख खानचा 'मोहबत्ते' सिनेमा पाहून आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. मात्र या सिनेमातील होळीचं गाणं चेहऱ्यावर नक्कीच हासू आणेल. अगदी काहीच वर्षांपूर्वी रामलीला आणि 'ये जवानी है दीवानी' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते, पण त्यातील अनुक्रमे 'लहू मुँह लग गया' आणि 'बलम पिचकारी'च्या सिग्नेचर स्टेप जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही खरे बॉलीवूड फॅन आहात शोले जसा आयकॉनिक चित्रपट आहे त्याचप्रमाणे त्यातील गाणीही सुपरहिट आहेत. त्यातील 'कब है होली?' हा डायलॉग जसा प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे यामधली होळीचं गाण 'होली के दिन...' हे सगळ्यात Colorful गाणं आहे. 'कटी पतंग' मधील 'आज ना छोडेंगे' आजही सर्वांच्या तोंडपाठ आहे. आशा पारेख आणि राजेश खन्ना यांची केमिस्ट्री या गाण्यातून पाहायला मिळते. आता दरवेळी ही गाणी प्ले करताना तुमच्या होळी खेळण्यामध्ये सारखा सारखा व्यत्यय येत असेल. तर युट्यूब वर तुम्ही 'Holi song Playlist 2020' किंवा 'holi song 2020'असं सर्च केल्यास ही सर्व गाणी तुम्हाला एकत्र मिळू शकतात. अनेक कंटेट क्रिएटर्सनी होळीच्या गाण्यांची प्लेलिस्ट बनवून युट्यूबवर अपलोड केली आहे. त्याचप्रमाणे ही गाणी युट्यूबवरून डाउनलोड करूनही तुम्ही होळीचा आनंद घेऊ शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या