Home /News /entertainment /

‘हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागावी’; राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त विधान

‘हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागावी’; राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त विधान

कोरोनाचा टाईम बॉम्ब फुटेल अशी भीती प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी व्यक्त केली आहे. शिवाय हिंदूंनी यासाठी मुस्लीम धर्मीयांची माफी देखील मागावी अशीही विनंती त्यांनी केली आहे.

    मुंबई 14 एप्रिल: कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतचं चाललं आहे. अन् या वाढत्या संक्रमणाला रोखण्यासाठी वैद्यकिय तज्ज्ञ सोशल डिस्टंसिंग म्हणजे गर्दी न करण्याचं आवाहन करत आहेत. त्यामुळंच लॉकडाउनचा पर्याय सरकारनं स्विकारला होता. पण आता कुंभमेळ्याच्या निमित्तानं सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजतील अन् कोरोनाचा टाईम बॉम्ब फुटेल अशी भीती प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी व्यक्त केली आहे. शिवाय हिंदूंनी यासाठी मुस्लीम धर्मीयांची माफी देखील मागावी अशीही विनंती त्यांनी केली आहे. “तुम्ही जो फोटो पाहताय तो कुंभ मेळा नाही तर कोरोनाचा अॅटम बॉम्ब आहे. या एक्सप्लोजनसाठी आपण कोणाला जबाबदार धरणार आहोत. 2020 मध्ये जेव्हा मुस्लीम धर्मीय एकत्र आले होते तेव्हा कोरोनाबाबत त्यांना काहीच माहित नव्हतं. अन् कोरोनाबाबत माहित असताना देखील कुंभमेळ्याच्या निमित्तानं हिंदूंनी इतकी गर्दी केली होती. त्यावेळी केलेल्या टीकेसाठी हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागायला हवी.” अशा आशयाची तीन ट्विट्स करुन राम गोपाल वर्मा यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणावर भाष्य केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे. अवश्य पाहा - ‘आमच्या भावनांशी खेळू नकोस’; जेनिफरचा ‘PUBG Look’ पाहून चाहते झाले अवाक अवश्य पाहा - ‘पोसता येत नाही तर मुलांना जन्म का देता?’; भीक मागणाऱ्या मुलांमुळं राखी संतापली देशात २४ तासांत आढळले 1 लाख 52 हजार 879 पॉझिटिव्ह रुग्ण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात 24 तासांत 1 लाख 52 हजार 879 करोनाबाधित आढळून आले आहेत. तर 90 हजार 584 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. 24 तासांत 839 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत 1 लाख 69 हजार 275 जणांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Ram gopal varma, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या