मुंबई, 03 ऑक्टोबर : सोनी मराठी (Sony Marathi ) वाहिनीवर ‘कुसुम’ (kusum ) ही नवी मालिका 4 ऑक्टोबरपासून भेटीला येण्यास सज्जा झाली आहे. विशेष म्हणजे, या मालिकेत सर्वांची लाडकी शितली म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत शिवानी कुसुमची भूमिका साकरताना दिसणार आहे. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. शितलीच्या भूमिकेप्रमाणे कुसम प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यास यशस्वी होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सोनी मराठी वाहिनी या मालिकेचे जोरोदार प्रमोशन केले आहे. त्यामुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागली आहे. ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज’ हे ‘कुसुम’ चे ब्रीदवाक्य सर्वांना आवडत आहे. आत्तापर्यंत या मालिकेच्या प्रोमोमध्ये माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम प्रेक्षकांना दिसली आहे व आवडत देखील आहे. वाचा : आमिर खानची मुलगी इरा Depressionनंतर करतेय ‘या’ समस्येचा सामना, VIDEO शेअर करत सांगितली व्यथा ‘दुनियेसाठी खपायचं आणि आई बापाला नाही जपायचं, असं कसं चालेल’, असं म्हणत कुसुम सगळ्या जाबदाऱ्या उत्तम पार पाडते. आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुम. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व महिला वर्ग ही मालिका सुरू होण्याची अतुरतेने वाट पाहत आहे. आता फक्त काही तास उरले आहेत. सोमवारपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हिंदी कुसुमचा मराठी अवतार एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स तर्फे ‘कुसुम’ नावाची हिंदी मालिका आली होती आणि ती खूपच लोकप्रियही झाली होती. 2001साली ती प्रसारित झाली होती आणि त्याच मालिकेचा हा मराठी अवतार आहे. तेव्हाही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती.