मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एकता कपूरच्या पार्टीत घाबरलेली दिसली हिना खान; VIDEO मध्ये दिसलं सत्य

एकता कपूरच्या पार्टीत घाबरलेली दिसली हिना खान; VIDEO मध्ये दिसलं सत्य

हिना खान काल रात्री एकता कपूरच्या दिवाळी बॅशमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने निळ्या रंगाचा लेहेंगा-चोली परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दिवाळी पार्टीत तिच्या एन्ट्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई,4 नोव्हेंबर- हिना खान   (Hina Khan)  काल रात्री एकता कपूरच्या  (Ekta Kapoor Diwali Bash)  दिवाळी बॅशमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने निळ्या रंगाचा लेहेंगा-चोली परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दिवाळी पार्टीत तिच्या एन्ट्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल   (Viral Video)  होत आहे. या व्हिडीओमध्ये हिना खान भीतीने घाबरलेली दिसत आहे. ती इतकी घाबरली होती की तिने पापाराझींना परत जाण्यास सांगितलं. इतकंच नाही तर व्हिडिओमध्ये पापाराझींमधील वाद आणि भांडणाचा आवाजही ऐकू येत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये हिना खान तिच्या कारमधून उतरते आणि एकता कपूरच्या घराकडे जाते असं दिसतं. या दरम्यान पापाराझी त्यांना घेरतात. ती पापाराझींना परत जाण्यास सांगते आणि आरामात फोटो-व्हिडिओ काढायला सांगते. हिनाचे अंगरक्षक तिच्याभोवती धावत येतात. हिना पुढे जात असताना, पापाराझी वाद घालतात आणि एकमेकांशी भांडण होत असल्याचा पापाराझींचा आवाज येत आहे.

हिना खानचा लुक-

घरात प्रवेश करण्यापूर्वी हिना खान खूप घाबरली होती. ही भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. हिना खान निळ्या रंगाच्या लेहेंग्यात पोहोचली होती. हिनाने प्लंगिंग नेकलाइनसह मॅचिंग बंडल बॅग, बंधगळा नेकलेस आणि सुंदर अंगठीसह तिचा लूक पूर्ण केला होता. हिनाने तिचे केस स्लीक बन केल होतं. तिने ब्लू आय मेकअप आणि हायलाइट केलेल्या गालांसह तिचा लूक कम्प्लिट केला होता. हिना खान खूपच सुंदर दिसत होती.

(हे वाचा:Diwali Party: दिव्यांका त्रिपाठी ते अली गोनी कलाकारांनी फेस्टिव्ह LOOK मध्ये....)

हिना एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे तिचे करोडो चाहते आहेत. हे सौंदर्य टिकवण्यासाठी ती खूप मेहनत घेते. मात्र अलीकडेच त्याचे वजन वाढत असल्याचं दिसत आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. पण नुकतेच हिनाने तिच्या फिटनेस आणि बॉडीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. तिनं एक पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये तिनं सांगितलं आहे की तिच्यासाठी शारीरिक दिसण्यापेक्षा मानसिक आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे.हिना खानने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, 'स्पष्ट कारणांमुळे गेल्या काही महिन्यांत माझं वजन वाढलं होतं आणि माझं वजन किती वाढलं याकडे मी खरोखर लक्ष दिलं नाही. माझ्यासाठी मानसिक आरोग्य अधिक महत्त्वाचं आहे आणि मला फक्त अशा गोष्टी करायच्या आहेत ज्याने मला आनंद दिला. लोक काय म्हणतील किंवा मी कशी दिसते याचा जास्त विचार न करता, कधी कधी तुम्ही जसे आहात तसे व्हा, तुम्हाला जसे वाटते तसे करा. शेवटी, जीवनात काहीही करण्यासाठी, योग्य मानसिक स्थितीत असणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Ekta kapoor, Entertainment, Hina khan