मुंबई, o7 डिसेंबर : ‘बिग बॉस 11’ फेम आणि छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती करोडो लोकांना प्रेरणा देते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोमधून तिने करिअरला सुरुवात केली. या शोमुळे तिला घरोघरी प्रसिद्धी मिळाली. यानंतर, ‘बिग बॉस 11’ मध्ये ती स्वत:ला सिद्ध करण्यात यशस्वी ठरली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. हिना खानचा प्रेमावर प्रचंड विश्वास आहे. ती तेरा वर्षांपासून रॉकी जयस्वाल सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पण सध्या तिच्या या लव्ह लाईफमध्ये काहीतरी गडबड चाललीये. तिच्या ब्रेकअपच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. हिना खान सध्या सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर करतीये कि ज्यामुळे तिच्या लव्ह लाईफमध्ये सगळं ठीक नाही असा अंदाज चाहते बांधत आहेत. इंस्टाग्रामवर तिने एक पोस्ट टाकून चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. तिची कोणाकडून तरी फसवणूक झाली असून ती दुखावली असल्याचे या पोस्टवरून लक्षात येत आहे. एवढंच नाही तर या पोस्टमध्ये ती चाहत्यांना देखील आयुष्यात सावध राहण्याचा सल्ला देताना दिसत आहे. हिनाच्या या पोस्टबद्दल चाहते विविध अंदाज बांधत आहेत. हेही वाचा - Aryan Khan : शाहरुख खानचा लेक अखेर वडिलांचं ‘हे’ स्वप्न पूर्ण करणार; फोटो शेअर करत म्हणाला… हिना खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, ‘‘तुम्ही आयुष्यात तुम्हाला धोका देणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष केलंत आणि आता त्याच्या तुम्हाला पश्चाताप होत असेल तरी स्वतः माफ करायला शिका. कारण तुम्ही मनाने खूप चांगले आहात त्यामुळे कोणाबद्दल वाईट विचार तुम्ही कधीच करू शकत नाही.’ एवढंच नाही तर पुढच्या पोस्टमध्ये ती म्हणतेय कि, ‘विश्वासघात ही एकमेव गोष्ट विश्वासघात हे एकमेव सत्य आहे जे तुमच्यासोबत राहते.’
हिना खानच्या या पोस्टने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर खळबळ उडाली आहे. तिने याबद्दल खुलेपणाने बोलावे आणि नेमके काय घडले ते सांगावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. चाहत्यांना तिच्याबद्दल काळजी वाटत आहे. एका चाहत्याने लिहिले, “सर्व ठीक आहे, आशा आहे की सर्व ठीक आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “हिना खानला आणखी बळ मिळो, सर्व काही चांगलं होईल.”
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही हिनाची पहिली मालिका होती. या मालिके दरम्यानच हिनाची रॉकी जैस्वालशी भेट झाली. रॉकी हा शोचा पर्यवेक्षक निर्माता होता आणि त्यांच्या मैत्रीचे सेटवर प्रेमात रुपांतर झाले. ‘बिग बॉस 11’ दरम्यान रॉकीने हिनाला प्रपोज केले होते. त्याचवेळी हिनाने 2020 मध्ये ‘हॅक्ड’ चित्रपटाद्वारे छोट्या पडद्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय तिने ‘विश लिस्ट’ आणि ‘अनलॉक’ सारख्या चित्रपटातही काम केले आहे आणि ‘लाइन्स’ चित्रपटाची निर्मितीही केली आहे.