मुंबई, 12 सप्टेंबर : सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या सिंगर रानू मंडल यांचं पहिलं गाणं नुकतंच रिलीज झालं. रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या रानूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिमेश रेशमियानं तिला त्याच्या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली होती. मागच्या काही दिवसांपासून हिमेशच्या स्टुडिओमधील रानू यांचा 'तेरी मेरी काहानी' या गाण्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्वांनाच रानू यांच्या पहिल्या गाण्याच्या रिलीजची उत्सुकता होती. या गाण्याचा टीजर हिमेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
या गाण्याचा टीझर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताना हिमेशनं लिहिलं, ‘ऑफिशिअल टीझर, देवाच्या कृपेनं ‘हॅप्पी हार्डी और हीर’चा एपिक ब्लॉकबस्टर ट्रॅक ‘तेरी मेरी कहानी’ चं पूर्ण गाणं 11 सप्टेंबरला रिलीज होत आहे. सर्वांच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.’ या गाण्याचं रिलीज एका मोठ्या इव्हेंटमध्ये करण्यात आलं. यावेळी रानू मंडल स्वतः उपस्थित होत्या. या इव्हेंटमध्ये रानू मंडल यांच्याबाबत बोलताना हिमेश भावूक झालेला दिसला.
विराटची 'वॉटर बेबी', अनुष्का शर्मानं शेअर केले HOT PHOTO
हॅप्पी हार्डी अँड हीर या सिनेमात हिमेश रेशमिया प्रमुख भूमिकेत आहे. या गाण्याच्या लॉन्चिंग वेळी रानू मंडल यांच्याविषयी बोलताना हिमेश खूपच भावूक झाला आणि तो त्याचे अश्रू रोखू शकला नाही. शेवटी त्याच्या पत्नीनं त्याला शांत केलं. यावेळी रानू यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. हिमेश प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच हिमेशचे अश्रू हे आनंदाश्रू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
‘एक प्यार का नगमा है’ गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी
रानू रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतींद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत असे आणि तिथून जात असे. एक दिवस त्यानं रानू यांचं प्यार का नगमा व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अकाउटवर अपलोड केला. त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कंटेंटच्या शोधात असणाऱ्या अनेक पेज पैकी एक पेज ‘बरपेटा टाउन द प्लेस ऑफ पीस’ला यतींद्रचा हा व्हिडीओ सापडला. त्यानी ते त्यांच्या पेजवर शेअर केला. अशा रितीनं हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अनेक वेब पोर्टल्सनी त्याची बातमी केली आणि रानूच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यांशी केली जाऊ लागली.
स्वागत नहीं करोगे हमारा! सलमानचा Dabangg 3 'या' दिवशी होणार रिलीज
रानू यांचे व्हिडीओ सतत शेअर होत असल्यानं सोशल मीडिया पेज चालवणाऱ्या अनेकांनी एतींद्र पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे रानूच्या गाण्याला रिअलिटी शोमध्ये संधी मिळावी. याशिवाय रिअलिटी शो मेकर्स सुद्धा त्यांच्या टीआरपीसाठी असा प्रकारच्या गोष्टी शोधत असतात आणि योगायोगानं दोन्ही गोष्टी जुळून आल्या बॉलिवूडमध्ये हिट गाणी दिलेल्या हिमेश रेशमियानं रानू यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांचं आयुष्य बदललं.
View this post on Instagram
#ranumandal arrives for her film trailer launch #viralbhayani @viralbhayani
रानू मंडल मूळ पश्चिम बंगालच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचं वय 60 वर्ष असून काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं आहे. त्यांना एक मुलगी आहे. तिनं काही दिवस रानू यांची काळजी घेतली मात्र मागच्या 10 वर्षांपासून तिनं आपल्या आईशी नातं तोडलं. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वेस्टेशनच्या बाजूला रानू यांचं घर आहे. मात्र तिथे तिचं सर्व सामन अस्ताव्यस्त पडलेलं असतं. या घराच्या भिंती कोसळत आहेत. अशा पडझड झालेल्या या घरात रानू एकट्या राहतात.
KBC 11 : 'बिहार का लाला' ठरला पहिला करोडपती, 1 कोटी जिंकून रचला इतिहास
सामान्यतः रानू बंगाली बोलतात. मात्र त्या हिंदी सुद्धा बोलू शकतात. त्या जेव्हा 7-8 वर्षांच्या होत्या तेव्हा पासून त्या गात आहेत. रेडिओ आणि टेप वरील रेकॉर्डर ऐकून त्या गाणं शिकल्या आणि मग संधी मिळाल्यावर त्या स्टेजवर गाऊ लागल्या. सुरुवातीला रानू यांनी रेल्वे स्टेशनवर गायला सुरुवात केली होते. त्यावेळी त्यांना गाण्याच्या बदल्यात काही ना काही मिळू लागलं तसं त्यांनी लता मंगेशकर यांची गाणी हूबेहुब त्यांच्या सारखंच गाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना समजलं की गाण्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा खर्च सुटतो आहे. त्यानंतर त्यांनी आणखी चांगलं गाण्याचा प्रयत्न करु लागल्या.
=====================================================
VIDEO: आता शत्रूची काय बिशाद! भारतीय लष्कराचा ताफा आणखी मजबूत होणार