अभिनेत्री अनुष्का शर्मा मागच्या काही काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय आहे. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते.
नुकतेच अनुष्कानं तिच्या इन्स्टाग्रामवर बिकिनीमधील काही फोटो शेअर केले. ज्यात ती बिचवर एंजॉय करताना दिसत आहे.
अनुष्कानं एका मागोमाग एक असे 3 फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंना तिनं वॉटर बेबी असं कॅप्शन दिलं आहे.
याआधीही अनुष्कानं ऑरेंज कलरच्या मोनोकीनीमधील फोटो शेअर केला होता. ज्यावर कमेंट करण्याचा मोह विराटलाही आवरला नव्हता.
बॉलिवूडपासून दूर असेलेली अनुष्का सध्या पती विराट कोहलीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. विराटनं सुद्धा त्याच्या इन्स्टाग्रामवर अनुष्कासोबतचा एक रोमँटिक सेल्फी शेअर केला आहे.
येत्या 15 सप्टेंबर पासून द. आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येत असल्यानं त्यानंतर विराटचं वेळापत्रक बीझी असणार आहे. त्यामुळे विराट आणि अनुष्का सध्या जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत स्पेंड करत आहेत.