डिअर कॉमरेड सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय यांचा एक हॉट किसिंग सीन आहे. अशा प्रकारचा सीन द्यायला नकार दिला म्हणून साई पल्लवी या अभिनेत्रीला या सिनेमातूनच डच्चू मिळाला.
कबीर सिंग सिनेमा हिट झाल्यानंतर बॉलिवूडकरांना विजय देवरकोंडा नावाची ओळख झाली. दाक्षिणात्य सिनेमा अर्जुन रेड्डीचा हा रिमेक. अर्जुन रेड्डीमध्ये विजयने मुख्य भूमिका साकारली होती. शिवाय विजयने नोटा आणि गीता गोविंदम सारखे हिट सिनेमे दिले आहेत. या विजयबरोबरच किसिंग सीन करायला पल्लवीने नकार दिला.
विजय लवकरच डिअर कॉमरेड या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजयचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. सुरुवातीला या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी काम करणार होती.
आता डिअर कॉमरेड या सिनेमात साई पल्लवीऐवजी अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे. ज्या किसिंग सीनबद्दल बोलत आहोत तो किसिंग सीन सिनेमाच्या ट्रेलरमध्येही दाखवण्यात आला आहे.
विजय देवरकोंडाला ऑन स्क्रिन किस करण्यास नकार दिला. म्हणून दिग्दर्शकाने अखेर पल्लवीला सिनेमातून काढलं आणि तिच्या जागी रश्मिकाला घेण्यात आलं.
या सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर रश्मिकाचा साखरपुडा तुटल्याच्या बातम्या सिनेवर्तुळात फिरत होत्या. रश्मिकाने काही दिवसांपूर्वी कन्नड अभिनेता रक्षत शेट्टीशी साखरपुडा केला होता. मात्र आता दोघांच्या नात्यात दुरावा आल्याने रक्षतने साखरपुडा मोडल्याचं म्हटलं जात आहे.