जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Hemant Dhome: 'झिम्मा' फेम दिग्दर्शकाचं फेसबुक अकाउंट झालं हॅक!

Hemant Dhome: 'झिम्मा' फेम दिग्दर्शकाचं फेसबुक अकाउंट झालं हॅक!

Hemant Dhome: 'झिम्मा' फेम दिग्दर्शकाचं फेसबुक अकाउंट झालं हॅक!

‘झिम्मा’ (Jhimma Marathi movie) या सुपरहिट मराठी चित्रपटाने कोरोना काळानंतर मराठी प्रेक्षकांना चांगले दिवस दाखवले. पण या (Jhimma Marathi movie director) चित्रपटाच्या दिग्दर्शकाला एका धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 28 जून: अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारा एक कलाकार म्हणजे (Hemant Dhome) हेमंत ढोमे. हेमंत याआधी बऱ्याच चांगल्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या समोर आला आहे. आज हेमंतसोबत एक धक्कदायक प्रसंग घडला असून त्याबद्दलची माहिती त्याने त्याच्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे. हेमंत ढोमेचं (Hemant Dhome facebook account hacked) फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची घटना घडली आहे. मागच्या अनेक काळात अनेक कलाकारांचं अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार घडले आहेत. नुकताच या स्कॅमचा बळी मन उडू उडू झालं फेम अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya raut instagram account hacked) सुद्धा ठरला. अजिंक्यचं इन्स्टाग्राम अकाऊंट काही कारणाने हॅक झालं होतं. असाच काहीस प्रकार हेमंत ढोमेच्या बाबतीत सुद्धा घडला आहे. वाढत्या सायबर गुन्हांच्या पार्श्वभूमीवर हेमंतने त्वरित आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना आणि प्रेक्षकांना ही माहिती दिली. हेमंतने आपल्या (Hemant Dhome Instagram) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत असं म्हणलं आहे, माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे… संबंधित पेजवर पोस्ट होणारी कोणतीही पोस्ट तूर्तास अधिकृत समजू नये.. पेज रिकव्हर करण्याचे प्रयत्न चालू आहेत… लवकरात लवकर पेज पूर्ववत होईल अशी आशा… धन्यवाद’.

जाहिरात

त्याचं एकुणात हॅक कसं झालं याबद्दल कोणतीच माहिती अजून समोर आली नाही. अशा हॅकिंग मधून अनेकवेळा अकाऊंट रिकव्हरी झाली नाही तर समस्या निर्माण होतात. काही वेळा अशा फ्रॉडमधून अनोळखी व्यक्तीना संबंधित अकाऊंटवरून मेसेज पाठवले जातात आणि त्यातून इतर अनेक विपरीत गोष्टी घडू शकतात. त्या टाळण्यासाठी हेमंतने त्वरित ही बातमी शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. हल्ली सायबर गुण्यांची वाढती संख्या बघता आपल्याकडून काळजी घेतलेली केव्हाही उत्तम असा इशारा सगळ्यांना या प्रकारामुळे मिळत आहे. हे ही वाचा-  Amruta Subhash: सुमन घेऊन येत आहे सासू सुनेची अनोखी कहाणी, पाहा नव्या सिरीजचा खास ट्रेलर!

 हेमंत हा एक गुणी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेच पण सध्या तो दिग्दर्शकाच्या भूमिकेत लक्षणीय कामगिरी करताना दिसत आहे. ‘झिम्मा’ या शंभर दिवस सिनेमागृहात चालणाऱ्या चित्रपटातून हेमंत एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या समोर आला. येत्या काळात त्याचा सनी हा चित्रपट सुद्धा प्रेक्षागृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात