Home /News /entertainment /

अमृता सुभाष घेऊन येतेय सासू सुनेची अनोखी कहाणी, पाहा नव्या सिरीजचा खास ट्रेलर!

अमृता सुभाष घेऊन येतेय सासू सुनेची अनोखी कहाणी, पाहा नव्या सिरीजचा खास ट्रेलर!

गली बॉय, बॉम्बे बेगम अशा प्रोजेक्टमधून हिट झालेली गुणी मराठी अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. तिच्या नव्या सिरीजचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे.

  मुंबई 28 जून: अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) नेहमीच दर्जेदार भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. अमृताकडे तिचा एक अनोखा अंदाज आहे ज्याने ती कायमच सगळ्यांपेक्षा खास आणि वेगळी ठरते. अमृताने मागे काही काळापूर्वीच ती नव्या प्रोजेक्टमधून भेटीला येत असल्याचं एका व्हिडिओमध्ये म्हणलं होतं आणि आता तिने दिलेलं आश्वासन खरं करून दाखवत ती एका नव्या सिरीजमध्ये (Amruta Subhash new series) दिसणार आहे ज्याचा ट्रेलरसुद्धा आज प्रदर्शित झाला. अमृता जुलै महिन्यात ‘सास बहू आचार pvt ltd’ (Saas Bahu Achaar Pvt Ltd) नावाच्या एका आगळ्या वेगळ्या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सिरीज झी 5 वर बघता येणार असून त्याचा अत्यंत गोड ट्रेलर (Saas Bahu Achaar Pvt Ltd trailer) आज प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अमृता सुमन हे पात्र साकारत आहे. अमृताची भूमिका ही एका हाऊसवाईफची असून स्वतःच्या बळावर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सुमन लोणच्याचा बिजनेस सुरु करते असं या ट्रेलरमधून कळत आहे. अमृताची भूमिका कायमच स्त्रीचं कणखर आणि खंबीर रूप आपल्याला दाखवत आली आहे. अगदी अवघाचि संसार मालिकेपासूनच अमृताने एक समंजस आणि खंबीर स्त्री पडद्यावर उभी केली आहे. आणि असंच एक हळवं आणि गोड पात्र सुमनचं सुद्धा आहे.
  यामध्ये ट्विस्ट असा की या तिच्या बिजनेस वूमनच्या प्रवासात तिला तिची सासू सुद्धा मदत करते. एरवी सुनेबद्दल कट कारस्थान करणाऱ्या सासूबाईंचा प्रेक्षकांवर भडीमार होत असतो. पण यामध्ये दाखवलेली सासू अगदी क्युट, मिश्किल आणि हसतमुख पण तेवढीच धीट सुद्धा आहे. आता सुमनची सासू तिला स्वतःच्या पायावर उभं करायला कशी मदत करते हे सिरीज आल्यावर स्पष्ट होईल. हे ही वाचा- Mangesh Desai Birthday: 'तू बिनधास्त कामाला लाग, मी...' सिनेमा करताना एकनाथ शिंदेंनी मंगेशला दिला होता विश्वास पण आलेला हा नवाकोरा ट्रेलर मात्र चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे. अमृता एकतर बऱ्याच दिवसांनी एका मस्त भूमिकेतून समोर येत आहे. ‘मेरे महादेव या तो मेरे लिए रास्ते बदल देंगे या फार मंजिल बदल देंगे’ असं एक खास आणि भयानक आत्मविश्वास देणारं वाक्य अमृतुच्या पात्राच्या तोंडी आहे. एका सुरेख पद्धतीने बांधलेली ही कथा नक्कीच प्रेक्षकांना अंतर्मुख सुद्धा करेल असा विश्वास वाटत आहे. ही एका स्त्रीच्या आत्मविश्वासाची कथा आहे जी संपूर्ण कुटुंब अगदी मनमोकळेपणाने आनंद घेऊन हसत हसत बघू शकत असं समजत आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi actress, Web series

  पुढील बातम्या