मुंबई, 11 मे: अभिनेता सलमान खानला (Salman Khan latest news) ‘बॉलिवुडचा भाईजान’ म्हटलं जातं. सोशल मीडियावर त्याचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. त्यामुळे त्याचे फोटो असोत किंवा व्हिडीओ, काही मिनिटांत व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान स्टेजवर आपले शूज (Salman Khan Removes Shoes on stage video) काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरुवातीला फॅन्स गोंधळात पडले; पण जेव्हा त्यानं असं का केलं हे समोर आलं तेव्हा सोशल मीडियावर सलमानचं फार कौतुक होत आहे. तुम्ही सुद्धा सलमान खानचे ‘डाय हार्ट फॅन’ असाल आणि तुम्ही आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला नसेल तर एकदा नक्की बघा. त्यामुळे तुम्हालाही समजेल की, ‘बॉलिवूडच्या भाईजान’नं कोणाच्या सन्मानासाठी स्टेजवर आपले शूज काढले. बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना महाराष्ट्रातील लहान मुलांपासून थोरा-मोठ्यांपर्यंत सर्व ओळखतात. त्यांचं राजकारणातील वजन आजही अनेकांना भारी पडू शकतं. शिवसेनेची स्थापना करून महाराष्ट्रातील राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना आजही खूप आदर दिला जातो. सध्या ते या जगात नसले तरी देखील त्यांची विचारसरणी फॉलो करणारे लाखो लोक आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खानसुद्धा बाळासाहेब ठाकरेंचा खूप आदर करतो. नुकतंच त्यानं बाळासाहेबांच्या फोटोला आदरांजली वाहताना स्टेजवर आपले शूज बाजूला काढून ठेवत, हा आदर व्यक्त केला. हे वाचा- UAE च्या प्रसिद्ध मॅगझिनने अमृता खानविलकरला म्हटलं Dancing Queen; फ्रंट पेजवर झळकली ‘चंद्रा’ ‘हा’ होता प्रसंग प्रसाद ओक स्टारर ‘धर्मवीर मु. पोस्ट ठाणे’(Dharamaveer) या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगचा (Dharamaveer Trailer Launch) कार्यक्रम ठेवण्यात आला होता. शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे (Anand Dighe Movie) यांच्या आयुष्यावर या चित्रपटाची कथा आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासह बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमावेळी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे आणि दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आलेले होते. या सर्व फोटोंना पुष्पहार अर्पण करण्यापूर्वी सलमाननं आपले शूज काढले आणि त्यानंतर आदरांजली वाहिली. हे वाचा -‘प्रचंड अभिमान’, Dharmaveer चे आशियातील सर्वात मोठे होर्डिंग; प्रसाद ओकने शेअर केला VIDEO सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल सलमान खानचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Salman Khan Video Viral) होत आहे. त्याचे चाहते हा व्हिडीओ सोशल मीडियावर सतत शेअर करत आहेत. व्हिडीओतील सलमानची कृती बघून त्याचं कौतुक होत आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या सलमान त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो येत्या काही दिवसांत ‘कभी ईद कभी दीवाली’ आणि तेलुगू चित्रपट ‘गॉडफादर’मध्ये (Godfather) दिसणार आहे. गॉडफादरमध्ये त्याच्यासोबत तेलुगू आयकॉन्स चिरंजीवी, नयनतारा आणि सत्यदेव कंचरण हे स्क्रीन शेअर करणार आहेत. याशिवाय त्याचा आणि कतरिना कैफचा ‘टायगर 3’ हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे.