छोट्या पडद्यावर येतेय नवी इन्स्पेक्टर सौदामिनी

मालिकेत इन्स्पेक्टरची एंट्री होत असेल की समजावं आता बऱ्याच घटना घडणार आणि आता एक लोकप्रिय चेहरा इन्स्पेक्टर बनून येतोय

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 08:26 PM IST

छोट्या पडद्यावर येतेय नवी इन्स्पेक्टर सौदामिनी

मुंबई, 03 जून : घाडगे & सून मालिकेमध्ये सध्या संपूर्ण घाडगे कुटुंब कियाराच्या कारस्थानांनी आणि डावपेचांनी त्रस्त झालं आहे. या सगळ्यामध्ये अमृता आणि माई मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. परंतु प्रत्येक वेळी कियाराची खेळी मात्र सगळ्यांना भारी पडतेय. तिचा खोटेपणा, गरोदर आहे असं सांगणं, घाडगे परिवाराला तिच्या वडिलांनी ब्लॅकमेल करणं, धमक्या देणं, हे सगळं घडतंय. यात कियारा अक्षयला आपण भारताच्या बाहेर जाऊ, कायमचे घाडगे सदनाला सोडू, असं सांगते आणि त्यामुळेच अक्षय द्विधा मनस्थिती आहे.

आता अक्षय आणि कियारा घर सोडून दुबईला जाणार हे सत्य अमृता आणि घरच्यांना देखील समजलंय. हे घडत असतानाच मालिकेमध्ये सौदामिनीची एन्ट्री होते. ही भूमिका साकारतेय हर्षदा खानविलकर.  हर्षदा खानविलकर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत मालिकेमध्ये दिसणार आहेत. ती अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणार आहे.

'या' घरगुती उपायांनी रिंकूने दोन महिन्यात कमी केलं 12 किलो वजन

रुग्णालयात भरती झाली सलमान खानची हिरोइन, PHOTO VIRAL


Loading...

हर्षदा छोट्या पडद्यावरचं लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. गेल्या वेळच्या बिग बाॅस मराठीतही हर्षदा काही काळ होती. हर्षदा कलर्स मराठीवर नवरा असावा तर असा हा शो करत होती. होम मिनिस्टरच्या धर्तीवर हा शो सुरू झाला होता.हक्काने कुरबुरी सांगायला अनेक कुटुंबांना हर्षदा भेटली. हर्षदा म्हणाली, या शोमुळे मी 600 कुटुंबाना भेटले. नवी नाती जोडली गेली. ती म्हणाली, नवरा असावा तर असा हा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कल्पना नव्हती हा प्रवास कसा होईल ते, कारण मी पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार होते. काही अनुभव नव्हता, पण मी आव्हान स्वीकारलं.

Makeup Official Teaser- दारू पिऊन घरातल्यांना शिव्या देतेय रिंकू राजगुरू

आता हर्षदा पुन्हा एकदा नव्या रूपात भेटायला येतेय. तिच्या फॅन्सना ही ट्रीट आहे.


VIDEO : विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत मुलींनी मिरवल्या तलवारी आणि एअर रायफल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 08:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...