नवी दिल्ली, 21 मार्च: ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सध्या देशभरात चर्चेत आहे. एकिकडे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहेत तर दुसरीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अनेक सेलेब्सच्या प्रतिक्रीयनंतर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान (Aamir Khan) यानं आता आपले मत व्यक्त केले आहे. त्याने दिलेली प्रतिक्रीया सध्या चर्चेत आली आहे. आमिर खाननं एस एस राजामौली यांचा चित्रपट ‘आरआरआर’च्या प्रमोशन कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याला ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटासंबंधी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर आमिरने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. मी हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे. कारण ही घटना आपल्या देशाच्या इतिहासातील एक अशी घटना आहे. ज्यामुळे अनेकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. ज्या घटनेनं अनेकांना दुःख दिलं आहे. तसेच, काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत (Kashmiri Pandits) जे काही झालं ते खूपच दुःखद आहे. त्यामुळे या विषयावर एक चित्रपट तयार केला गेला आहे. जो प्रत्येक भारतीयाने बघायला हवा आणि प्रत्येक भारतीयाने हे लक्षात ठेवायला हवं की, एका व्यक्तीवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा हे सर्व कसं दिसतं. कसं वाटतं. अशा शब्दात आमिरने यावेळी प्रतिक्रीया व्यक्त केली. यासोबतच तो पुढे म्हणाला, या चित्रपटाने ज्यांना माणूसकीवर विश्वास आहे अशा प्रत्येक व्यक्तीच्या भावनांना स्पर्श केला आहे आणि हीच या चित्रपटाची सुंदरता आहे. मला आनंद आहे की चित्रपटाला एवढं यश मिळत आहे. त्याच सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. मी हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.