Home /News /entertainment /

Farmani Naaz : 'हर हर शंभू' गाण्यामुळे वादात सापडली पण नशीब उजळलं, आता 'बिग बॉस 16'मध्ये करणार एन्ट्री?

Farmani Naaz : 'हर हर शंभू' गाण्यामुळे वादात सापडली पण नशीब उजळलं, आता 'बिग बॉस 16'मध्ये करणार एन्ट्री?

'हर हर शंभू' हे गाणे गाऊन प्रसिद्धीच्या झोतात आलेली फरमाणी नाझ (Farmani Naaz) सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या गाण्यामुळे फरमाणी नाझ वादात सापडली आहे.

    मुंबई, 6 ऑगस्ट : 'हर हर शंभू' हे गाणे गाऊन प्रसिद्धीच्या झोतात आलेली फरमाणी नाझ (Farmani Naaz) सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या गाण्यामुळे फरमाणी नाझ वादात सापडली आहे. वादात अडकल्यानंतर गायिकेची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे आणि फरमाणीची ही लोकप्रियता पाहता तिला सलमान खानचा सर्वात लोकप्रिय शो 'बिग बॉस 16' ची ऑफरही मिळाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सध्या याचीच चर्चा सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. फरमाणी नाझचा भाऊ फरमाननं त्याच्या बहिणीला मिळालेल्या बिग बॉसच्या ऑफरविषयी सांगतिलं की, फरमाणीला निश्चितपणे बिग बॉस 16 ची ऑफर मिळाली आहे. अद्याप तिनं या ऑफरविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. ती म्हणाली की तिने हा शो याआधी पाहिला आहे आणि ती भांडण लावणे आणि भांडण करणार्‍यांपैकी नाही, त्यामुळे ती शोबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. हेही वाचा -  Kaushal Inamdar: 'रिऍलिटी शो'मध्ये गाणाऱ्या गायकांचं पुढे काय होतं? कौशल इनामदार यांची पोस्ट चर्चेत फरमान पुढे म्हणाला की, सपना चौधरीसह अनेक स्पर्धकांना मिळालेल्या वाईट वागणुकीमुळे, ती शोबद्दल खूप गोंधळली आहे. रिअॅलिटी शोमध्ये कोणीही कोणाची मदत करत नाही, असे फरमाणीचं मत आहे. त्यामुळे ती खूप घाबरते. त्यामुळे फरमाणी बिग बॉसची ऑफर स्विकारणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. फरमाणी नाझने गायलेले 'हर हर शंभू' हे शिवभजन चांगलेच व्हायरल झाले. या भजनाबद्दल त्यांना मुस्लिम कट्टरवाद्यांकडून सतत धमक्या येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ती चांगलीच प्रसिद्धीस आली आहे. हेही वाचा -  'वजन वाढल्याने बॉडी शेम केलं गेलं'; मिस युनिव्हर्स Harnaaz Sandhu चा दुःखद खुलासा बिग बॉसच्या 16व्या सीझनचा ग्रँड प्रीमियर 1 ऑक्टोबरला होणार आहे. सलमान खान सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शोचा प्रोमो शूट करू शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Big boss, Singer, Social media, Viral

    पुढील बातम्या